निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला गती, वाहतुकीच्या कोंडीत कोलाड नाका गुदमरतोय.
प्रतिनिधि समीर बामुगडे
रायगड (रोहा – कोलाड) :- गेली बारा तेरा वर्षे सरकारच्या बे जबाबदार पणाच्या धोरणांमुळे तसेच ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले असल्याचे दिसून येत आहे. त्यात पेण ते महाड दरम्यानच्या कामाला अधिक दिरंगाई होत गेली त्यामुळे मार्गालगतचे गाव ग्रामस्थ व्यवसायिक दुकानदार सह प्रवासी नागरीक हतबल झाले आहेत तर आता ऐन लोकसभा निवडणुकीतच या मार्गाच्या कामाला वाकण ते इंदापूर दरम्यान गती दिली असल्याने निवडणुक रणधुमाळी तसेच लग्न सराईत ही खोद कामे सुरू केल्याने कोलाड नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी तर बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांची मोठी दमछाक होत असल्याने कोलाड आंबेवाडी नाका अक्षरशः या कोंडीमुळे गुदमरत आहे.महामार्गाचे काम करत असलेल्या ठेकेदाराची एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था पाहवयास मिळत आहे सुरू असलेल्या कामात कोणताही टप्पा पुर्ण अवस्थेत नसताना अधिक पुढे कामांची खोद कामे जलत गतीत सुरू याचा नागरीकांना अभिमान आहे मात्र त्यात काही ठिकाणी ही कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे एकीकडे दुःख सहन करावा लागत असल्याने सर्वत्र वाहतुकीच्या कोंडीला तर 
काही ठिकाणी आपघाताला सामोरे जावे लागत आहे ही परिस्थिती निर्माण झाली आहे .काय दुःख सांगावे परी आम्ही, काही उरलेच नाही या जगी गेली तेरा चौदा वर्ष या मार्गाचा वनवास कोकणातली प्रवाशी निमूटपणे सहन करत आहेत.तर याचे दुःख सांगावे कोणाला हेच कळत नसल्याने या मार्गाची ,त्यावरील सर्व्हिस रोड गटारे नदीवरील पूल मार्गाच्या साईड पट्ट्या अधून मधून सोडलेले काँक्रीटकरण तसेच वाकन,सुकेळी खिंड, खांब, पुई,येथील मार्गाची कामे आजही अर्धवट अवस्थेत आहेत तसेच पुई येथील महिसदरा नदीपात्रातील पुलाचे काम वर्षना वर्ष अर्धवट अवस्थेत त्यात आता चक्क कोलाड आंबेवाडी नाक्यावरील चौकातील मार्गाच्या कामाला गती दिली असून मेन मार्ग खोदकाम सुरू तर मागील काही बनवलेले सर्व्हिस रस्ते व गटार लाईन ची कामे देखील अर्धवट अवस्थेत असल्याने नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे त्यात मोठे धुळीचे साम्राज्य पसरत असल्याने येथील प्रवासी नागरीक तसेच व्यवसायिक दुकानदार यांची मोठी दमछाक होत असताना दिसत आहे.मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरकरणाचे काम गेली बारा तेरा वर्षे चालू आहे तर या रखडलेल्या कामाला जबाबदार कोण रायगड सह कोकणातील पत्रकारांनी आंदोलने केली त्यात अनेक निवडणुका आल्या गेल्या तसेच या मार्गासाठी लाखो कोटी रुपयांचा निधी आला खर्च झाला तर अधिक पुढे होत आहे त्यामुळे पाण्यासारखा पैसा खर्च केला तरी देखील मार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याचे बोलले जात आहे तर मार्गासाठी अनेकांचे पोटाची खळगी भरणारी शेत जमीन गेली कानाची राहती घरे व्यवसायिक दुकाने पोल्ट्री फार्म त्याच बरोबर दररोज रोजी रोटी करण्यारांची हात मजुरी देखील गेली तसेच चौपदरी रस्ता करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या नागोठणे इंदापूर दरम्यान जमिनी शासनाने भू संपादित केलेल्या अल्पभूधारकशेतकऱ्यांना अद्याप त्याचा पुरेसा मोबदला देखील मिळाला नसल्याचे बोलले जाते तर तोही प्रश्न ऐरणिवर आहे.
प्रतिक्रिया,
मार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील कै द ग तटकरे चौकात सद्या जोरदार काम सुरू आहे मार्गावरून होणारी वाहतूक ही कमकुवत बनविलेल्या सर्व्हिस रोड मार्गाने होत आहे जड अवजड वाहनांची वाहतूक तसेच त्याला जोडला गेलेला रोहा मार्ग त्यामुळे भर चौकात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे हे काम किती महिने की किती वर्ष चालत राहणार आहे याच काही गणित नाही तर या मार्गाला लागून बनविलेले सर्व्हिस मार्ग हे अरुंद अवस्थेत असल्याने तसेच त्याला जोडलेले गटारे आणि काही व्यवसायिक दुकाने त्यामुळे बाजारात ये जा करणाऱ्या प्रवासी नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तसेच मागील काही महिन्यांपूर्वी चौकातून एक गटार लायन तयार करण्यात आली होती ती कोलाड रोहा मार्गाच्या मेन चौकातील गटाराला मोठा भगदाड पडले आहे तसेच प्रवाशी वर्गासाठी सदरील ठेकेदाराने अथवा संबधीत खात्याकडून यावर उपाय योजना कराव्यात अशी मागणी येथील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे .
….. दिनकर सानप कोलाड
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













