नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वादळी वाऱ्याने गोठ्याचे नुकसान.. – आजचा महाराष्ट्र

वादळी वाऱ्याने गोठ्याचे नुकसान..

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी 

           थोडक्यात बचावले शेतकरी..

नागपुर (रामटेक) :- दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याचे काचुरवाही परिसरात आगमन झाले. यातच काचुरवाही येथील रहिवासी अशोक पांडुरंग डोकरीमारे वय ५५ वर्ष यांच्या शेतातील जनावरांचा गोठा वादळी वाऱ्याने उध्वस्त झाला .अचानक आलेल्या या वादळी वाऱ्याने क्षणातच गोठ्यावरील टिनाचे शेड

उखळून टाकले. तर विटांनी बांधकाम केलेली भिंत देखील कोसळून पडली. वादळी वाऱ्यामुळे जनावरांच्या जीवाला धोका होऊ नये या उद्देशाने अशोक डोकरीमारे यांनी गोठयात असलेल्या जनावरांची सुटका केली. व काही क्षणातच वादळी वाऱ्याने गोठ्याचे नुकसान केले. यामध्ये शेतमालक थोडक्यात बचावले. घटनेची माहिती कोतवाल कैलास सहारे यांना देण्यात आली. घटनास्थळी जाऊन त्यांनी घटनेचा पंचनामा केला. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी उपसरपंच अनिकेत गोल्हर यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]