महिलांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन
सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी
नागपुर(रामटेक) :– १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून मातृका फाउंडेशन व किम्मतकर हॉस्पिटल तर्फे मुली व महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर महात्मा फुले विद्यालय पाचगाव (खैरी बीजेवाड़ा) येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरात ६४ मुली व महिलांची आरोग्य तपासणी करून मोफत औषध गरजू रुग्णांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी व्यवस्थापन लक्ष्मी राजकुमार खोब्रागडे (ग्राम पंचायत सदस्य) यांनी केले. डॉ. अंशुजा किम्मतकर यांनी सर्व उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून आरोग्याच्या बाबतीत अनेक मूलमंत्र दिले. यावेळी सर्व महिलांनी डॉ. अंशुजा किम्मतकर यांचे व मातृका फाउंडेशनचे आभार मानले. कु. सीमा परतेती, कु. श्रेया वंजारी यांनी अथक प्रयत्न केले. या प्रसंगी महात्मा फुले शाळेतील मुख्याध्यापक धीरज यादव व शिक्षक, कर्मचारी तसेच खैरी बीजेवाड़ा ग्राम पंचायत यांचे सहकार्य लाभले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













