नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , चोरांनी साधला ७ हजार रुपयावर डाव : शनि मंदिर ची घटना – आजचा महाराष्ट्र

चोरांनी साधला ७ हजार रुपयावर डाव : शनि मंदिर ची घटना

सचिन चौरसिया ( तालुका प्रतिनिधी )

नागपुर (रामटेक) :- शहर व गावा मध्ये चोरांच्या धुमाकुळ वाढला असुन चोर मंदीराच्या दानपेटीना निशाना बनवत असुन मंदिराची सुरक्षा धोक्यात दिसत आहे. मागील काही दिवसा अगोदर जैन मंदिर ची दानपेटी ११ एप्रिल ला फोडुन ४५ हजार रुपये उडवीले. २४ एप्रिल ला काचुरवाही मध्ये परमात्मा एक सेवक भवन ची दानपेटी फोडुन ७ हजार रुपये उडविले. ही घटना होत नाही तर रामटेक-मौदा रोड शनि मंदिर मधील २५ एप्रिल ला मध्यरात्री येथील गणेश मंदिर व हनुमान मंदिर ची दानपेटी फोडुन एकुन ७ हजार रुपये चोराट्यांनी लप्पास केल्याची घटना घडली आहे. मुख्य शनि मंदिर मधील दानपेटी चे ताले टूटत नसल्यामुळे तिथे चोरी होवू शकली नाही. अन्यथा मोठी रक्कम चोरीला गेली असती. दि. २५ एप्रिल २०२४ ला मध्य रात्रीला घडली. ह्या घटनेची माहीती शनी मंदीराचे सचिव सुरेश चव्हान यांनी पुलीसांना दिली.

       

 मंदीराचा बाजुचा पुजार्‍यांची खोली असुन पुजारी आराम करत होते. सकाळी पुजा करण्यासाठी उठले तेव्हा त्यांना मंदीरात चोरी झाल्याचे कळले. चोरांनी मंदीराच्या दाराचे लाँक तोडुन दानपेटी उचलुन मंदीरा पासुन काही अंलरावर नेवून दगळाने फोडुन त्या मधील नगद रक्कम चोरुन पसार झाले. या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात अज्ञात चोराट्यावर अप क्र. २७४/ २४ कलम ४५७ , ३८० भादवी गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस करीत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]