नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आदर्श सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा सपन्न – आजचा महाराष्ट्र

आदर्श सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा सपन्न

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी

रामधाम येथे ७५ जोडप्यांचं ‘शुभमंगलम सावधान’…!

नागपुर (रामटेक) :– नागपूर जिल्ह्यातील मनसर येथे प्रसिद्ध रामधाम तीर्थक्षेत्रात दरवर्षी मोठ्या उत्साहाने सामूहिक सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. यात गोर-गरीब वर-वधूचे चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे निःशुल्क स्वरूपात विवाह लावून देण्यात येते. या समाजसेवी कार्याला आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर, महिला व बाल विकास विभाग,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (महाराष्ट्र शासन) यांची प्रमुख मदत लाभते.सन २००५ पासून चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे निःशुल्क सर्वधर्मीय विवाह सोहळा पार पाडल्या जाते. आतापर्यंत सुमारे १२६६ जोडप्यांचे ‘शुभमंगलम सावधान’ रामधाम येथे झाले

आहे. यावर्षी ७५ गरीब वर-वधूचे सामूहिक विवाह अत्यंत हर्षोउल्हासात वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले. जि.प.शाळेतून सर्व ७५ नवरदेवांना ट्रेलरवर बसवून डी.जे,बँड, आदिवासी नृत्याच्या तालावर नाचत त्यांची सामूहिकरित्या वरात काढण्यात आली.व हिंदु, बौद्ध व आदिवासी समाजाच्या रितिरिवाजाने ७५ जोडप्यांचे शुभमंगलम सावधान संपन्न झाले.या सर्व नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी माजी मंत्री सुनीलबाबू केदार यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. नवविवाहिताना भेट वस्तू देण्यात आल्या. मा. माजी आमदार रमेशचंद्र बंग साहेब जि.प.अध्यक्षा मुक्ता कोकोड्डे, एस क्यू जमा माजी आमदार, हुकूमचंद्र आमधरे संचालक कृ. उ. बा. स. मुंबई, माजी जि.प.अध्यक्षा रश्मी बर्वे, मा.विशाल बरबटे रामटेक विमानसभा प्रमुख(उ.बा.ठा.), दयाराम रॉय राष्ट्रीय अध्यक्ष रा. प. रा सरपंच संघटना, शांतताई कुमरे सदस्य जि.प., ज्योतीताई उमरे अध्यक्ष बेटा- बेटी बचाव, नशा हटाव, अशोक चिखले, दुर्गाताई सर्यांम, योगेश रंगारी, कलाताई ठाकरे माजी सभापती, गौरव चौकसे, नवीन चौकसे, देविदास जामदार, ऋषिकेश किंम्मतकर, हेमंत जैन, हेमराज चोखाद्रे, डॉ इरफान अहमद, कैलास नरुले सरपंच, बनशीलाल ब्रह्मनोटे, अजय खेडरकर, रवी बावनकुळे, सर्याम साहेब, शंकर चामलाठे, विमलताई नागपुरे, नामदेव मडावी कांचनताई धनोरे, शोभाताई राऊत, शारदा बर्वे, मिताराम सव्वालाखे, गजेंद्र चौकसे, वेंकट स्वामी, यांच्यासह विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्व पाहुण्यांनी नवविवाहित जोडप्यांना शुभाशीर्वाद देऊन पुढील आयुष्याचा शुभेच्छा दिल्या.  चंद्रपाल चौकसे साहेब यांनी मुलाखत मदे सांगितले माझा आईने दिलेले वचन मी पूर्ण करतो आहे, १० टक्के रक्कम मी सामाजिक कार्यात खर्च करतो आहे. प्रत्येक वर्षी कुठलेही आर्थिक मदत घेत नसून स्वखर्चाने नव युवक व युवती चे लग्न सोहळा पार पडत असतो हा सोहळा विदर्भात पहिला विवाह सोहळा आहे कि १५ वर्षांपासून सुरु आहे तेही निशुल्क आतापर्यंत १२६६ लग्न सोहळा पार पडला आणि या वर्षी ७५ जोडप्यांचे विवाह पार पडला. अध्यक्षीय भाषनातं मा. ना. माजी मंत्री सुनिलबाबू केदार साहेब यांनी चौकसे परिवार यांची स्तुतीसुमन उदघार करून नवविवाहिताना शुभेच्छा दिल्या.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]