लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान
प्रतिनिधि
मुंबई :-दि.२६. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.२६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.७७ टक्के मतदान झाले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
वर्धा – ३२.३२ टक्के
अकोला -३२.२५ टक्के
अमरावती – ३१.४०टक्के
बुलढाणा – २९.०७ टक्के
हिंगोली – ३०.४६ टक्के
नांदेड – ३२.९३ टक्के
परभणी -३३.८८ टक्के
यवतमाळ – वाशिम -३१.४७ टक्के
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













