नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ‘रोड सेफ्टी वोट रॅली रायगड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभाग – आजचा महाराष्ट्र

‘रोड सेफ्टी वोट रॅली रायगड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभाग

रायगड :- रायगड जिल्हा प्रशासन, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेन रायगड, पोलीस विभाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ एप्रिल रोजी महाड येथे व दिनांक २५ एप्रिल रोजी श्रीवर्धन येथे लोकसभा २०२४ निवडणुकीमध्ये रायगड मधील सर्व मतदारानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मतदानाचा हक्क बजावावा यासाठी या दोन्ही शहरांमधून ‘रोड सेफ्टी वोट रॅली’ काढण्यात आली. या रोड सेफ्टी वोट रॅलीमध्ये महाड येथे महाड प्रांत श्री बाणापुरे , तहसीलदार श्री महेश शितोळे , महाड नगरपरिषद मुख्याधिकारी,पोलीस निरीक्षक महाड सिटी श्री. तडवी , मोटार वाहन निरीक्षक किरण पाटील, समोवानी दिग्विजय कोळी, सर्व ड्रायव्हिंग स्कूल संचालक व पत्रकार बंधू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. श्रीवर्धन येथील रॅलीमध्ये श्रीवर्धन नगरपालिका मुख्याधिकारी श्री. लबडेजी, पोलीस निरीक्षक श्रीवर्धन श्री रिकामे साहेब, तहसीलदार वाकलेकर साहेब, श्रीवर्धन प्रांत श्री महेश पाटील साहेब , दिघी सागरी पोलीस उपनिरीक्षक श्री मोरे साहेब , मोटार वाहन निरीक्षक श्री किरण पाटील समोवनी दिग्विजय कोळी, वाहन चालक सचिन गायकवाड सर्व ड्रायव्हिंग स्कूल मालक पत्रकार बंधू व इतर उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]