हनुमान जयंती उत्साहात साजरी
सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी
हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर (रामटेक) :- हनुमान जन्मोत्सवानिमित्त शहरातील मंदिरांमध्ये रुद्राभिषेक, सुंदरकांड पठण, हवन, दहीहंडी, महाआरती करण्यात आली. खैरी बिजेवाडा येथील हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष आर. श्रीनिवास राव, अण्णाजी चाफले, रमेश नाटकर, पुजारी आदेश नाटकर, ऍड. संजय खंडेलवाल, विवेक तोतडे, कमलाकर हिंगे, विष्णू हिंगे, प्रीतम दियेवार, आनंद यादव, खुसेंद्र डडोरे, राजवामन आदींनी प्रयत्न केले. विशेष बाब म्हणजे आनंद यादव यांचे वडील आणि आजोबा यांच्या काळापासून त्यांचे कुटुंबीय या मंदिरात ५० वर्षांपासून महाप्रसादाचे योगदान देत आहेत.

गांधी वॉर्डातील हनुमान मंदिरात मधे गिरीश काठिकर, सुमित कोठारी, दिनेश माकडे, नरेश माकडे, महेश माकडे, गजानन गुंडुकवार, रेखा गुंडुकवार, अरविंद कोहळे, कांचन कोहळे , प्रमोद व्यवहारे, सुरेखा माकडे, गणेश कोल्हे, रघुनाथ वाघमारे आदींनी कार्यक्रमा करिता परिश्रम घेतले. लंबे हनुमान मंदिर, पिपलेश्वर हनुमान मंदिर, शिव नगर हनुमान मंदिर आदी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हनुमानजींच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. रामटेक आणि परिसरामध्ये पोलिस खात्याकडे १२० मंदिरांची नोंदणी आहे. त्यासोबत अनेक प्राचीन छोटी मंदिरे आहेत. त्याठिकाणी धार्मिक विधीसह महाप्रसाद करण्यात आला. कडक ऊन असूनही लोकांनी मंदिरात जाऊन प्रार्थना केली. मन्नत पूरी करणारे हनुमान चिचाळा येथील राधा लिल्हारे म्हणाली की मन्नत पूरी करणारे हनुमानजी आहेत. त्यां म्हणाल्या की मी गरीब बाई आहे. लंबे हनुमानजिला प्रार्थना केली की माझ्या नातवाला नोकरी लागू दे नातवाला मिलिट्री मधे नोकरी लागली म्हणून त्यांनी मंदिरात महाप्रसाद केला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













