नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , संगीतमय श्रीराम कथा महोत्सवचे आयोजन – आजचा महाराष्ट्र

संगीतमय श्रीराम कथा महोत्सवचे आयोजन

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी

कार्यक्रमादरम्यानच उरकणार गरीब मुलीचा विवाह सोहळा

नागपुर (रामटेक ):- तालुक्यातील खोडगाव ( काचुरवाही) येथील हनुमान मंकार्यक्रमादरम्यानच उरकणार गरीब मुलीचा विवाह सोहळादिरात अयोध्या येथे श्रीराम लल्लाची प्राणप्रतिष्ठा निमित्याने दि. २५ एप्रिलपासून २ मे पर्यंत श्रीराम कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा यादरम्यान येथे दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार असुन याचा ज्यास्तीत ज्यास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहण हनुमान मंदीर समिती व समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

      कार्यक्रमामध्ये दररोज सकाळी ६ ते ८ वाजता पर्यंत काकडा भजन व दिंडी, त्यानंतर ९ ते ११ वाजेपर्यंत व सायंकाळी ७ ते ९.३० वाजता पर्यंत रामकथा होणार आहे. तसेच महोत्सवा दरम्यान हरीपाठ सुद्धा होणार आहे. गु.ह.भ.प. वाणीभुषण श्री नारायण महाराज शेंडे हे कथा प्रवक्ता राहणार आहे. दि. १ मे ला होम हवण व विशाल दिंडी सोहळा, हरीकिर्तन तथा २ मे ला काल्याच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यानच याच दिवशी गावातीलच एका गरीब लेकीचा विवाह सोहळा पार पडणार आहे. यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]