नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लोकसभा निवडणूक –२०२४ निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणूक कामकाजाचा आढावा – आजचा महाराष्ट्र

लोकसभा निवडणूक –२०२४ निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणूक कामकाजाचा आढावा

प्रतिनिधी

रायगड :- दि.१९. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ३२- रायगड लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. आज सामान्य निवडणूक निरीक्षक संजीवकुमार झा आणि निवडणूक पोलीस निरीक्षक श्रीमती जोयस लालरेम्मवी यांनी मतदार संघातील निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.राजस्व सभागृह येथे निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणा तसेच नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक श्री. झा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक श्रीमती जोयस लालरेम्मवी , पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे,अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, ज्योस्त्ना पडियार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आदी उपस्थित होते.श्री झा म्हणाले, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रियेत आपली जबाबदारी उत्कृष्टपणे हाताळावी. पारदर्शकपणे सर्व प्रक्रिया पार पाडावी. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार सर्वांनी कार्यवाही आणि कारवाई करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.यावेळी श्री झा यांनी एकूण जिल्ह्याचा आढावा, मतदान प्रक्रियेमध्ये असलेले मनुष्यबळ व्यवस्थापन,अधिकारी-कर्मचा-यांचे प्रशिक्षण, साहित्य व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था, मतदान यंत्र सुरक्षा व व्यवस्थापन, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणूक खर्च व्यवस्थापन, मतपत्रिका, पोस्टल बॅलेट, मतदार मदत केंद्र, तक्रार निवारण केंद्र, सी – व्हीजील ॲप, ८५ वर्षांवरील व्यक्तींना तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तींना गृहमतदानाची सुविधा, मिडीया सेल आदींबाबत आढावा घेतला. मतदार संघातील सर्व निवडणूक यंत्रणाच्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.पोलीस निरीक्षक

श्रीमती जोयस यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी जिल्हा प्रशासनाने निवडणूक तयारीबाबत माहिती दिली.पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला.बैठकीला सर्व नोडल अधिकारी व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.यावेळी श्री झा आणि श्रीमती जोयस लालरेम्मवी यांनी कंट्रोल रूम आणि मीडिया सेल ला भेट देऊन तेथील कामकाजची पाहणी केली आणि कामकाजाचा आढावा घेतला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]