रामटेक तालुक्यात शांततेत मतदान
सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला सुटकेचा मोकळा श्वास
नागपुर (रामटेक) :- शहरासह तालुक्यात दि.१९ एप्रील ला निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली . सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेला सुरवात झाली . उन्हाचे तपतपते स्वरूप पाहुन विशेषता सकाळी तथा दुपारी ४ नंतर मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली.

सकाळी ११.३० वाजता पर्यंत मतदान केंद्रावर गर्दी दिसुन आली असता १६.१४ टक्के मतदान झाले. मात्र दुपारच्या सुमारास मतदानाची गती मंदावली . दुपारी ३ वाजता ४०. १० टक्के मतदान तर ५ वाजतापर्यंत ५२.३८ % मतदान झाले. असल्याची माहिती तहसिलदार रमेश कोळपे यांनी दिली .मतदानादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नाही. निवडणूक निर्णय अधिकारी तसेच रामटेक पोलिसांनी मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता. माहिती लिहेस्तोवर निवडणुक निर्णय अधिकारी तथा संबंधितीत अधिकाऱ्यांनी सविस्तर व पुर्ण माहिती पुरविली नसल्यामुळे ५ नंतर उर्वरीत वेळेत ५४.४१ % मतदान झाले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













