नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , १९ एप्रिलला होणार पहिल्या टप्प्यात १०२ जागांवर मतदान – आजचा महाराष्ट्र

१९ एप्रिलला होणार पहिल्या टप्प्यात १०२ जागांवर मतदान

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी

नागपुर (रामटेक) ; भारतात निवडणूकीचे बिगुल वाजला असता निवडणूक आयोगाने पूर्ण भारतात ७ टप्पात निवडणूक घेण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पहिल्या टप्पातील मतदान हे १९ एप्रिलला होणार आहे. तसेच लोकसभा निवडणूकीतील पहील्या टप्यातील प्रचार हा संपला असुन दि. १९ एप्रिल २०२४ ला मतदान आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमधील लोकसभेच्या १०२ जागांसाठी मतदान होणार आहे. २१ राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, बिहार, आसाम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपुर, मेघालय, मिझोरम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार, जम्मू-कश्मीर, लक्षद्वीप आणि पाँडिचेरीचा समावेश आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील जागांबद्दल सांगायचं झाल तर अरुणाचल प्रदेश-२, बिहार-४, आसाम-५, छत्तीसगड-१, मध्य प्रदेश-६, महाराष्ट्र-५, मणिपुर-२, मेघालय-२, मिझोरम-१, नागालँड-१, राजस्थान-१२, सिक्कीम-१, तामिळनाडू-३९, त्रिपुरा-१, उत्तर प्रदेश-८, उत्तराखंड-५, पश्चिम बंगाल-३, अंदमान आणि निकोबार-१, जम्मू-कश्मीर-१, लक्षद्वीप-१ आणि पाँडिचेरीमध्ये एका जागेवर मतदान होणार आहे. दि. १९ एप्रिलला मतदाना नंतर अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]