नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , विद्यासागर कला महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन – आजचा महाराष्ट्र

विद्यासागर कला महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी

नागपुर (रामटेक) :- विद्यासागर कला महाविद्यालय खैरी ( बिजेवाडा ) रामटेक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी भीम गीत तसेच देशभक्तीपर गीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. के. यु.

पिल्लई यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेशकुमार यांनी प्रास्ताविक केले. गीतगायन स्पर्धेत आचल गौरखेडे हिने प्रथम क्रमांक, स्नेहा रोकडे हिने द्वितीय क्रमांक, साक्षी मोहनकर हिने तिसरा क्रमांक पटकाविला. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ रवींद्र पानतावणे डॉ.सावन धर्मपुरिवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर कविता सादर केल्यात. गीत गायन स्पर्धेचे परीक्षण प्रा.अनिल दाणी व डॉ. सुरेश सोमकुवर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार रवींद्र पानतावणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.गिरीश सपाटे, डॉ. सतीश महल्ले, डॉ. विलास जायभाये तसेच सर्व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]