नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रामटेक चे आमदार आशिष जयस्वाल यांच्या कारचा भीषण अपघात – आजचा महाराष्ट्र

रामटेक चे आमदार आशिष जयस्वाल यांच्या कारचा भीषण अपघात

सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी

महीला वकील गंभीर जखमी तर कार चालक सुखरुप

नागपुर (रामटेक) :- रामटेक विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार अँड. आशिष जयस्वाल यांच्या कारचा भीषण अपघात झाला असुन हा अपघात नागपूर – जबलपूर रोडवर असलेल्या केरडी फाट्यावर झाला.रामटेक वरुन कन्हान येथे दि. १० एप्रिल २०२४ ला पंतप्रधान मोदीजीच्या सभेला जात असतांना रामटेक चे आमदार आशिष जयस्वाल यांच्या गाडीने राष्ट्रीय महामार्गाच्या केरडी फाट्याजवळ महीला वकीलाचा गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत महीला ही गंभीर स्वरुपात जखमी झाल्यामुळे तिला तात्काळ रुग्नालयात हलविण्यात आले.माहीती नुसार आमदार आशिष जयस्वाल यांची इनोवा गाडी क्र. एमएच ४०

बीटी १७१७ असुन गाडी चालक मनोज गोतमारे हे आपल्या सहकार्‍या सोबत गाडीत बसुन कन्हान येथे पंतप्रधान मोदीजीच्या सभेला जात असतांना. नागपूर वरुन महीला वकील ही आपल्या चालका सोबल गाडी क्र. एमएच ३६ झेड ८१८३ नी येत असतांना नागपूर – जबलपूर रोड वरील मोदीजीच्या सेभेसाठी महामार्गावरील रोड वरील वाहतुकीत बदल केल्यामुळे केरडी फाट्याजवळच्या वळणावर नागपूर वरुन येणार्‍या वकील महीलेचा गाडीला जोरदार धडक झाल्यामुळे मारोती गाडी ही रोडच्या बाजूला फेकल्या गेली . गाड्याची धडक इतकी जोरदार होती की ईनोवा गाडीचा समोरील पूर्ण भाग हा चकनाचुर झाला असुन दुरर्‍या गाडीतील महीला वकील मनिषा राउत गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना तात्काळ कांद्री येथील जवाहर नेहरु दवाखाण्यात नेण्यात आले. त्यांची हालत गंभीर असल्यामुळे नंतर त्यांना कामठी जवळील आशा हाँस्पिटल मध्ये नेण्यात आले. पंरतु डोक्याला जबर मार असल्यामुळे त्यांना नागपूर येथील न्युराँन हाँस्पिटल येथे अतिदक्षता विभागात भरती करुन उपचार सुरु असल्याची माहीती असुन त्यांची प्रकृती ठिक आहे.आमदार आषिश जयस्वाल यांचा गाडीचे चालक व सहकारी यांना किरकोळ ईजा असल्याचे सुत्रांनी सांगितले. समोरील तपास नागपूर जिल्हाचे ग्रामीचे पोलीस अधीक्षक यांचा मार्गदर्शनाखाली कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुढील तपास करीत असुन पोलीस यंत्रना कोणती भूमिका घेईल यावर सर्वाचे लक्ष लागले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]