नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रायगड लोकसभा पक्ष नेते जोमात पदाधीकारी कार्यकर्ता कोमात – आजचा महाराष्ट्र

रायगड लोकसभा पक्ष नेते जोमात पदाधीकारी कार्यकर्ता कोमात

प्रशांत (प्रसाद) मोरे

रायगड (रोहा) :- लोकसभा निवडनुकांचॆ तारखा निवडणुक आयोगाकडून जाहीर होताच रायगड लोकसभा मतदार संघातील आजी,माझी,इच्छुक उमेदवार यांनी आप आपल्या परीने मोर्चे बांधनीस सुरवात केली.सहकारी पक्ष व वेगवेगल्यां संघटनेतील प्रमुख नेत्याशी आपले जुने वैरत्व विसरण्याचे व विसरवण्याचे प्रयत्न सुरू करून आपण एकमेकास राजकीय क्षेत्रात कसे फायद्याचे आहोत हे पटवून देण्याचे काम सध्या रायगड लोकसभा मतदार संघात जोरदारपणे सुरू आहे परंतु या राजकीय नेत्यांना आपल्याला त्या शिखरावर नेणाऱ्या मतदार राजाच्या वोट बँकेचा विसर पडलेला दिसत आहे त्यात रायगड जिल्हा अग्रेसर आहेरायगड जिल्हा तशी क्रांतीकारांची भूमी येथे नेहमीच राजकीय आखाड्यात चुकीचे अंदाज लागतात जिल्ह्यातील प्रमुख पक्ष शेतकरी कामगार पक्ष,शिवसेना पक्ष,काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी पक्ष,भारतीय जनता पक्ष हे पाचही प्रमुख पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या जोरावर वेळोवेळी आपली ताकद दाखवणारे व दाखवण्याचा प्रयत्न करणार मजबूत पक्षांच्या राजकीय संघटना अशी मतदार संघात त्यांची ओळख यात मतदारांची व कार्य करत्यांची साथ ही त्यांना भरघोस प्रमाणात लाभते परंतु नेत्यांच्या आताच्या या फायद्याच्या राजकारणामुळे मतदार व कार्यकर्त्यांमध्ये घरघर लागुन पक्षांची ताकत फारच बिकट झालेली दिसत आहे नफ्या,तोट्याच्या राजकारणात कार्यकर्ते नेहमी संघर्षात राहिले गावागावात वैमानश्यात राहिले परंतु येथील नेते नेहमीच फायद्यात राहिल्याचे चित्र रायगड मतदार संघात पहावयास मिळते कार्यकर्ते व छोटे पदाधिकारी हे आपले सर्वस्व मानणाऱ्या नेत्यांच्या अशा दलबदलूपणामुळे संभ्रम अवस्थेत पडलेले पाहावयास मिळत आहे प्रत्यक्षात पदाधिक कार्यकर्त्यांच्या अशा अवस्थेमुळे मतदारही विचारात पडलेला दिसत आहे अशा फुटी तुटीच्या राजकारणामुळे रायगड जिल्ह्यात आधीच असलेल्या पाच पक्षांमध्ये आणखीन तीन नवीन पक्षांची भर पडलेली दिसत आहे जुने शिवसेना शिंदे गट,शिवसॆना नवीन उद्धव ठाकरे गट,काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी जुनी अजित पवार गट,राष्ट्रवादी नवीन शरद पवार गट,भारतीय जनता पक्ष,वंचित आघाडी या सर्वांची आजी खासदारांना मोट बांधताना खूप अडचणींना सामना करावयास लागत असल्याचे दिसत आहे तसे त्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे आजी खासदारांनी आपल्या राजकीय क्षेत्रातील आखाड्यात मातब्बर असलेले गुरूंच्या शिक्षणाचा पुरेपूर अनुभव घेऊन त्यांनी मित्रपक्ष महायुतीच्या प्रमुख नेते व पदाधिकारी यांना एकत्र केल्याची फोटो प्रसार माध्यमातून दिसत आहेत परंतु मतदार संघातील कार्यकर्ता यांचे मात्र कोठेही मनोमिलन होताना दिसत नाही ते करण्यात आजी खासदार यशस्वी होतात का हे पाहणे जसे मजेशीर असेल तसेच या सर्व विसंगतीचा निवडणुकीत हार पत्करलेले माजी पराभूत खासदार फायदा कसे उठवतात हेही पाहणे गरजेचे आहे अनेक वेळा खासदार मंत्रिमंडळात मंत्री होऊनही ते त्यांनी केलेल्या विकास कामाबद्दल न बोलता मी निष्कलंक कसा आहे असे सांगून आजी खासदारांच्या भ्रष्टाचाराबद्दल वेळोवेळी बोलताना दिसत आहेत राज्यात महाआघाडीचे सरकार मध्ये हेच आजी खासदार त्यांचे सहकारी असताना सर्वकाही अलबेला अशा अवस्थेत तीन वर्ष सत्तेचा उपभोग घेतला तेव्हा त्यांना ते गद्दार दिसले नाही परंतु आज तेच त्यांचे सहकारी भारतीय जनता पक्षाच्या महायुतीमध्ये सामील होऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार झालेले पाहता त्यांचे सहकारी आजी खासदार व भारतीय जनता पक्ष गद्दाराच्या भूमिकेत दिसू लागला ही हास्यास्पद बाब आहे माजी पराभूत खासदारांची अवस्था तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून मला करमेना अशी झाल्याची दिसत आहे जनतेत आजी व माजी दोनही ऊमेदवार खासदारानबद्दल नाराजीचा सूर जरी असला तरी हि निवडनूक राष्टभक्ती,देशाचा विकास,स्वाभिमान,समाजाचा सामाजिक विकास अशा मूद्यानवर भारतीय जनता पक्ष सन्मानीय पंतप्रधान नरेन्द्रजी मोदीजींच्या नेत्रुत्वात मुद्द्यांवर लढत असून महा यूतीतुनआजी खासदार निवडणूक लढवीत असल्याने त्यांचे पारडे जड आहे तरीही मतदार राजा कुनाला कौल देतो ते पाहने रंजक राहील या जमवा जमवेच्या राजकारणात एक मात्र नक्की आता होणाऱ्या या निवडणुकीत राजकीय नेत्यांचे उमेदवारांचे सहकारी लोमते तसेच मित्र पक्षांचे नेते तुपाशी आणि कार्यकर्ते मात्र उपाशी असे चित्र नक्की आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]