नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे महामानव ज्योतिबा फुले- प्रा.उके – आजचा महाराष्ट्र

स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे महामानव ज्योतिबा फुले- प्रा.उके

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी

नागपुर (रामटेक) :- स्थानिक रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालय, रामटेक व दमयंतीताई देशमुख बी.एड. व डी.एड. कॉलेज, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ एप्रिल २०२४ रोज गुरुवारला क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना विभागप्रमुख प्राध्यापिका चेतना उके यांनी म्हटले की जोतिबा फुले हे भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे महामानव आहेत जर ते नसते तर

आज आम्ही स्त्रिया फक्त चूल आणि मूल या संकल्पनेपुरतेच मर्यादित राहिलो असतो पण जोतिबा फुलेंमुळे आज मी विभागप्रमुख म्हणून महाविद्यालयाचे कामकाज पाहात आहे असे सांगितले.या कार्यक्रमाप्रसंगी बी.ए. प्रशासकीय विभाग प्रमुख प्रा.चेतना उके, बी.एड. विभागप्रमुख प्रा.उर्मिला नाईक, डी.एड. विभागप्रमुख प्रा.शालू वानखेडे, नॅक समनव्यक प्रा.ज्ञानेश्वर नेवारे, प्रा.किरण शेंद्रे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.देवानंद नागदेवे, प्रा.डॉली कळमकर, प्रा.मेघा जांभुळकर तसेच इतर प्रा.कला मेश्राम, प्रा.अमित हटवार, प्रा.अनिल मिरासे, प्रा.विलास मडावी, प्रा.मयुरी टेम्भुरने, प्रा.आकाश मोहबिया, अतुल बुरडकर,राजेंद्र मोहनकर, गीता समर्थ, सुरेश कारेमोरे, निकिता अंबादे, निकिता फाये, सतीश कळंबे, संदीप ठाकरे इत्यादिसह विद्यार्थी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]