नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , अलिबाग येथे मतदार जनजागृती साठी”उत्सव लोकशाहीचा बाईक रॅलीला” उत्स्फूर्त प्रतिसाद – आजचा महाराष्ट्र

अलिबाग येथे मतदार जनजागृती साठी”उत्सव लोकशाहीचा बाईक रॅलीला” उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी आलिबाग

रायगड (अलिबाग) :- दि.१०. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ निमित्ताने जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने आयोजित “उत्सव लोकशाहीचा बाईक रॅली” साठी मतदार, युवक, महिला अधिकारी -कर्मचाऱ्यांसह उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्यासह जिल्हा पोलिस अधिकारी सोमनाथ घार्गे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथून हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. याप्रसंगी मतदान जागृतीबाबत पथनाट्याचे आयोजन अलिबाग नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आले होते.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून आज सकाळी आठ वाजता सुरु झालेली रॅली अलिबाग शहरातील विविध भागातून नेण्यात आली. यावेळी नवमतदार, युवक व नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीसाठी आवाहन करण्यात आले.बाईक रॅलीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. घार्गे यांच्यासह उपजिल्हा निवडणूक

अधिकारी स्नेहा उबाळे, प्रांताधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, तहसीलदार विक्रम पाटील, अलिबाग नगरपरिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, लायन्स क्लबचे सदस्य यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रिझम संस्थेतर्फे मतदार जनजागृतीपर पथनाट्य कलाकारांनी सादर केले.

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]