नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पत्रकार जयप्रकाश पवार समाज भूषण पुरस्काराने सन्मानित – आजचा महाराष्ट्र

पत्रकार जयप्रकाश पवार समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

रायगड :- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष,तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कोकण प्रदेश नेते, साप्ताहिक मास लिडर सह संपादक , सत्य पोलिस टाइम्स जिल्हा प्रतिनिधी,मी नागरिक फाऊंडेशन कराड या संस्थेचे उपाध्यक्ष जयप्रकाश पवार यांना मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार केंद्रीय सामाजिक न्याय व अधीकारीता मंत्री,तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय

अध्यक्ष ना.रामदासजी आठवले यांच्या हस्ते आणि असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.हा कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कोकण प्रदेश अध्यक्ष आयु.प्रकाशजी मोरे यांच्या 67व्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने भीमछाया सांस्कृतिक केंद्र, मुंबई कपिलवस्तु बुद्ध विहार,कालीना सातांकृझ (पु) येथे पार पडला.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला समर्पित राहून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक,कार्यात त्याग व सेवा भावनेनी निरंतर कार्यरत राहून मोलाचे कार्य करून समता, स्वातंत्र्य,व बंधुता ही भारतीय संविधानाची मुलभूत तत्वे व राष्ट्रीय एकात्मता जपत असल्याने ह्या कार्याबद्दल अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्याचा उल्लेख करून हा पूरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी,संस्था, संघटना, नातेवाईक ,मित्र परिवार, पत्रकार बांधव, यांनी त्यांना शूभेच्छा देवून अभिनंदन केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]