नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , उमेदवारी अर्ज दाखल करताना घ्यावयाची दक्षता व आवश्यक तरतुदींचे पालन करावे – आजचा महाराष्ट्र

उमेदवारी अर्ज दाखल करताना घ्यावयाची दक्षता व आवश्यक तरतुदींचे पालन करावे

नाशिक :-  दि. ४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात २० दिंडोरी आणि २१ नाशिक लोकसभा मतदार संघासाठी २६ एप्रिल ते ३ मे २०२४ या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना आवश्यक तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.निवडणुकीची अधिसूचना २६ एप्रिल २०२४ रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ ही वेळ निर्धारित करण्यात आली असून या निर्धारित वेळेतच नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे आहे.इच्छुक उमेदवार व समर्थकांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या शंभर मीटर परिसरात फक्त तीन वाहने आणता येणार आहेत. यासाठी पोलिस अधिकारी त्या ठिकाणी शंभर मीटर परिसराची निश्चिती ( मार्कींग ) आधीच केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करणारे उमेदवार आणि त्यांच्या समवेत चार व्यक्ती अशा एकूण पाच व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात एकाच दाराने प्रवेश देण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी पोलिस विभागाकडून सहायक पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असून पोलिस नोडल अधिकारी या ठिकाणी आवश्यक पोलिस बंदोबस्तासह उपस्थित राहतील.नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांनी या सर्व बाबींची नोंद घ्यावी. नामनिर्देशन पत्र आयोगाकडून निर्धारित वेळेतच दाखल करावयाचे असून नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी भारत निवड़णूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]