परमात्मा एक मानव मंदिराचे उदघाटन
सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी
नागपुर (रामटेक) :- सृष्टीचे निर्माते एका परमेश्वराचा मानवाला परिचय करून देणारे, अंधश्रद्धा निर्मूलन, वाईट व्यसन, स्त्रीभ्रूण हत्या, जातीय भेदभाव नष्ट करणारे, मानव धर्माचे संस्थापक व सर्व सेवकांचे सद्गुरू, महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०३ व्या जयंती निमित्य बहुद्देशिय परमात्मा एक सेवक मंडळ नगरधन येथे नवनिर्मित परमात्मा एक मानव मंदिराचे उदघाटन रामटेक पंचायत समितीचे उपसभापती श्री. नरेंद्रजी बंधाटे (परमात्मा एक सेवक हमलापुरी) 
यांचा शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मंडळाचे मार्गदर्शक श्री. श्रावणजी बावनकुळे व श्री. मोहित ईखार, श्री. राजेश सरोदे, श्री. प्रवीण ठाकरे, श्री. दिनेश बावनकुळे यांचा प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी बहुद्देशिय परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेशजी बिरणवार, उपाध्यक्ष श्री. देविदासजी ठाकरे, कोशाध्यक्ष योगेश क्षीरसागर, सचिव राधेश्याम लिल्हारे, सहसचिव राजू देवांगण, संचालक दत्तू दिवटेलवार, सुरेंद्र बिरणवार, श्रावण गाथे, रवींद्र वंजारी, परसराम बावनकुळे, सौ. कलावती ईखार, श्री. विठ्ठलजी येळने, श्री. दिलीप बिरणवार, श्री. अनिल येळने, राजेराम सरोदे, किशोर ईखार व सर्व सेवक-सेविका, बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













