खवटी (देऊळवाडी)गावामध्ये शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात
प्रतिनिधी राजेंद्र दळवी
रत्नागिरी (खेड) :- खेड तालुक्यातील खवटी (देऊळवाडी)गावामध्ये शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पालखीचा तिसरा मान दळवी परिवार यांना मिळाला. सदर प्रसंगी मंडणगड ,खेड, दापोली मा.आमदार माजी माननीय संजयराव कदम साहेब यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी 
माजी आमदार संजयराव कदम वतीने दळवी परिवार सत्कार करण्यात आले .सदर नियोजित कार्यक्रम केदारनाथ नाट्य तमाशा मंडळ पारंपारिक नमन व महाप्रसाद ठेवण्यात आला होता. यावेळी
केदारनाथ पद्मावती सुकाय कोटी श्री कालय मारका देवाचे नावे पद्मावती चे चांगभलं, हरहर महादेव अश्या घोषणाबाजी ने आजूबाजूचा परिसरात घोषणाबाजी झाली. यावेळी सर्व ग्रामस्थ हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













