सामाजिक कार्यकर्ते निलेश भाई महाडिक यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
प्रतिनिधी विश्वास निकम
आमदार महेंद्रशेठ दळवी, रोहा तालुकाप्रमुख मनोजकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश
रायगड (कोलाड) :- जसजशी खासदारकीची निवडणूक नजदिक आली असून तसतसे अनेकांचे पक्ष प्रवेश सुरु झाले आहे.रोहा तालुक्यातील पुई येथील उद्धव ठाकरे गटाचे कट्टर समर्थक निलेश महाडिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेऊन शिंदे शिवसेना गटात पक्ष प्रवेश केला आहे.

आ. महेंद्र दळवी यांच्या अलिबाग तालुक्यातील थळ येथील निवास्थानी जाऊन शिंदे शिवसेना गटात पक्षप्रवेश केला आहे यावेळी शिंदे शिवसेना गटाचे रोहा तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे. निलेश महाडिक हे सामाजिक संघटनेत काम करीत असून कोकण वासियांचा बुलंद आवाज तसेच जय महाराष्ट्र २४ तासचे मुख्य संपादक असून त्यांची समाजात चांगली ओळख असुन याचा फायदा शिंदे शिवसेना गटाला नक्की होईल.
यावेळी निलेश महाडिक यांनी शिंदे गट शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले शिंदे गटातील आ.महेंद्र दळवी हे अतिशय कर्तव्यदक्ष आमदार असुन त्यांनी या मतदार संघातील अनेक विकास कामे केली असून त्यांच्या कार्यप्रणाली विश्वास ठेऊन मी हा शिंदे गटात प्रवेश करीत असून यामुळे पक्ष वाढीसाठी माझा ही अथक प्रयत्न असेल
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













