नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , घर टैक्स व पानी बिल वेळेवर भरणा करा : मुख्याधिकारी – आजचा महाराष्ट्र

घर टैक्स व पानी बिल वेळेवर भरणा करा : मुख्याधिकारी

सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी

नागपुर (रामटेक) :- नगरपालिका रामटेक मार्फत सर्व थकीत मालमत्ता कर धारकांना व थकीत पाणीपट्टी धारकांना कर भरना करण्याची विनंती रामटेक नगरपालिका मुख्याधिकारी पल्लवी राउत यानी केली आहे. त्या म्हणाल्या की आर्थिक वर्षातील शेवटचे ४ दिवस नगरपालिका कार्यालय सुट्टीच्या दिवशी सुद्धा कर भरणाकरिता उघडे राहील. नागरिकांनी त्यांच्याकडे थकीत असलेला कर तात्काळ भरणा करावा. भरणा करावा. कर भरणा न केल्यास महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत, औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अनव्ये दिनांक १ एप्रिल २०२४ पासून थकीत करावर २% मासिक व्याज म्हणजेच २४% वार्षिक व्याज आकारणी करण्यात येईल. तसेच ५००० पेक्षा अधिक थकीत कर असलेल्याची मालमत्ता जप्ती तसेच नळ जोडणी खंडित करण्याची कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी दंड तसेच मालमत्ता जप्तीसारखी कठोर कार्यवाही टाळण्याकरिता तात्काळ कर भरणा करावा असी विनंती केली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]