नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , डोहात बुडून मुलाचा मृत्यू आसोली गावातील घटना – आजचा महाराष्ट्र

डोहात बुडून मुलाचा मृत्यू आसोली गावातील घटना

सचिन चौरसिया (रामटेक)तालुका प्रतिनिधी

नागपुर (रामटेक) :- अरोली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आसोली गावात एका १५ वर्षीय मुलाचा डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सविस्तर वृत्त नुसार अरोली पोलीस ठाण्या हद्दीतील आसोली गावातील रहिवासी १५ वर्षीय अतुल उमेश सहारे हा आपल्या २ मित्रांसह गावाजवळील डोहात पोहायला गेला

असतांना अचानक अतुलला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोलात जाऊन बुडू लागला.बुडल्याची माहिती अरोली पोलिसांना मिळताच अरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळ गाठले.पोलिसांनी तात्काळ मुलाला बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे उपचाराकरिता नेण्यात आले.मात्र उपचारादरम्यान अतुलचा मृत्यू झाला.शवविच्छेदन करून शव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात असून अरोली पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आले आहे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]