राष्ट्रीय आदर्शच्या निसर्गदुतांनी सुरेवानी येथे घेतले निसर्गानुभव
सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी
नागपूर (रामटेक) :- पारशिवनी तालुक्यात नवेगाव खैरी येथे बनयान ट्री फाऊंडेशन, पेंच व्याघ्र प्रकल्प नागलवाडी (वन्यजीव) आणि राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमांतर्गत बनयान ट्री फाउंडेशनचे सहायक संचालक संजय करकरे व राष्ट्रीय आदर्श विद्यालय शिक्षण मंडळ रामटेकचे सचिव मयंकराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली निसर्ग पर्यटन संकुल सुरेवानी येथे निसर्ग शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी पेंच व्याघ्र प्रकल्प नागलवाडी (वन्यजीव) येथील ए.सी.एफ. संदीप भारती, आर. एफ. ओ. प्रवीण लेले, बनयान ट्री फाउंडेशनचे आकाश लोणबैले, जगदीश धारणे, शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेचे मार्गदर्शक शिक्षक साक्षोधन कडबे यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात निसर्ग निरीक्षण, भ्रमंती, निसर्ग सापशिडी, निसर्ग संदेश कार्ड निर्मिती, चित्रकला स्पर्धा असे विविध निसर्गपूरक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमामुळे मुलांना अगदी जवळून निसर्ग अनुभवता आल्याने चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.या शिबिरात हरित सेनेचे निसर्गदूत अंजली कळमकर, सेजल 
कळमकर, आरुषी राऊत, समीक्षा सोनटक्के, भुवनेश्वरी शेंडे, वंशिका सावरकर, प्रतीक्षा वारकर, आरुषी भागडकर, नंदिनी पुरकाम, प्रतीक्षा तुपट, वंशिका ठाकरे, सुहानी ढोंगे, त्रिवेणी परतेती, समीक्षा गोळांगे, दुर्गा डायरे, नेहा सिरसाम, प्राजक्ता दुनेदार, सरस्वती राऊत, अनुष्का ढोरे, प्रीती धूर्वे, रंजना टेकाम, नेहा इनवाते, गायत्री नेवारे, दिव्या इडपाची, अश्विनी कुंभरे, आयुष गुरभेले, प्रणव ढोंगे, वैभव सहारे, प्रणय उईके, रोहण बांबोडे, यश डायरे, विकेश कोरचे, नयन सोनटक्के, गोविंद चक्रवर्ती, अनुश मेश्राम, पवन ठाकूर, दर्शन बेदरे, नेहार राऊत, नैतिक ढोरे, प्रणय इडपाची, आर्यन भुर्रे, कुणाल उईके, सक्षम सोनेकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













