रामटेक येथे वसंतोत्सव वर्धापन दिन साजरा
सचिन चौरसिया रामटेक तालुका प्रतिनिधी
एक तरी असुदे अंगी कला – शाहीर बावनकुळे
नागपूर (रामटेक) :- वसंतोत्सव कार्यक्रमाचे आयोजन सरस्वती संगीत विद्यालय रामटेक येथे करण्यात आले. प्रथम सरस्वती पूजन श्री प्रकाशराव ठाकरे यांचे हस्ते संपन्न झाले. त्या नंतर मुलांच्या ख्याल गायन कार्यक्रम पार पडला विहान सहारे यांनी विविध पक्षी व प्राण्यांच्या आवाजाने सादरीकरण करुन सरस्वती भजन मंडळ कन्हान यांचे भजनाच्या कार्यक्रम झाला समारोपीय कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष शाहीर राजेंद्र बावनकुळे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर संवाद 
मध्ये सांगितले की एक तरी असुदे अंगी कला ,नाहीतर काय फुका जन्मला ? असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नेहमी आपल्या वाणीतून सांगत असे, कलेचा छंद हा छान छंद आहे. आपली लोककला लुप्त होऊ नये , सांस्कृतिक परंपरा सर्वांनी जोपासावी संगीत, हार्मोनियम, तबला विशारद नरेंद्र महल्ले सर उत्कृष्ठ शिक्षक आहे ते ३० वर्षापासून रामटेक ला येऊन विद्यार्थीना संगीताचे धडे देत आहे आणि आज त्यांचे विद्यार्थि विशारद झाले. प्रषाशनिय बाब आहे असे शाहीर बावनकुळे यांनी आपल्या भाषण व्यक्त केल. कार्यक्रमाला विजय वांढरे, गजानन वडे, रत्नदीप वाघमारे राजेंद्र बावणे , अजय भोस्कर, प्रकाश तीतरमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. मनीष कुरटकर, प्रणय सोमकुवर ,उज्वल तितरमारे, वाघाडे सर ,रोकडे सर बेलखुडे सर ,पुंड सर यांनी हा कार्यक्रम यस्वीतेसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आभार प्रदर्शन संचालक नरेंद्र महल्ले सर यांनी केले व प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













