नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रामटेक शहरातील २६ कोटी रुपयाचे विविध विकासकामाचे भूमिपूजन संपन्न – आजचा महाराष्ट्र

रामटेक शहरातील २६ कोटी रुपयाचे विविध विकासकामाचे भूमिपूजन संपन्न

सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी 

नागपुर (रामटेक) :- रामटेक शहरातील २६ कोटी रुपयांची विविध विकासकामांचे भूमिपूजन रामटेकचे आमदार ॲड आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना रामटेक तालुका प्रमुख विवेक तुरक, जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख कमलेश शरणांगत, शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख रश्मी काठिकर, माजी नगराध्यक्षा नलीनी ताई चौधरी, माजी नगरसेवक सुमित कोठारी, युवासेना शहर प्रमुख विश्वास पाटील, विनायक सावरकर, उपस्थित होते. रामटेक नगर परिषद क्षेत्रातील गडमंदिर, रामटेक येथे विद्युत व्यवस्था व इतर अनुशांगानिक कामे करणे. ५ कोटी रुपये, गढमंदीर परिसरात सामाजिक केंद्र बांधकाम करणे ३ कोटी रुपये, रामटेक शहरातील विवीध रस्ते डांबरीकरण १६७ लक्ष रुपये, अठरांभुजा गणेश देवस्थान रामटेक येथे सभागृह नुतनीकरण करणे २० लक्ष रुपये, मलनिस्सारण व पर्जन्य जलाचा निचरा करणे करिता तिलक वॉर्ड येथे संगोडे शाळा मुख्य द्वार ते श्री बोपचे व श्री बोपचे यांचे घरापासून ते राष्ट्रीय महामार्ग पर्यंत पायाभूत सुविधा उभारणे ३० लक्ष रुपये, भगतसिंग वार्ड ता. रामटेक येथे साई मंदिराच्या बाजुला सभागृह बांधकाम करणे १० लक्ष रुपये, श्री हनुमान सार्वजनिक देवस्थान मंगळवारी वार्ड येथे सभामंडप बांधकाम करणे १० लक्ष रुपये, रामटेक बस स्थानक चौक विकास करणे ८० लक्ष रुपये, रामटेक एन्ट्री पॉईट परिसर विकास करणे १२.५ लक्ष रुपये, राखी तलाव परिसर विकास करणे २५० लक्ष रुपये, संत जगनाडे चौक परिसर विकास करणे २२.५ लक्ष रुपये, अंबाळा गेट चौकाजवळ परिसर विकास करणे १२५ लक्ष रुपये. नगर परिषद रामटेक येथील नेहरू मैदान क्रिडांगण विकास करणे ३३० लक्ष रुपये, आपला दवाखाना वरील प्रशासकीय इमरातीत वाचनालय व फर्निचर सुविधा तयार करणे १७ लक्ष रुपये, गांधी वार्ड येथे साई मंदिरच्या बाजूला सभागृह बांधकाम करणे १० लक्ष रुपये, मोठी गड्पायरी मंदिर जवळ सभागृह बांधकाम करणे १० लक्ष रुपये, रामतलाई कुंडा जवळ सुशोभिकरण व लादीकरण करणे १० लक्ष रुपये, स्वामी विवेकानंद वॉर्ड येथील कटकमवार लेआऊट मधील मोकळ्या जागेचा विकास करणे ५४ लक्ष रुपये, मलनिस्सारण व पर्जन्य जलाचा निचरा करणे करिता मटन मार्केट ते कत्तलखाणा येथे पायाभूत सुविधा उभारणे ८० लक्ष रुपये, रामजी महाजन देशमुख शाळेच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे १७.५ लक्ष रुपये, सामाजिक सुविधा पुरविण्याकरीता स्मशानभूमीचा विकास करण्याकरिता शवदहन वाहिनी घेणे १६१ लक्ष रुपये, विनोबा भावे वार्ड येथे राजू हटवार ते अब्दुल अझीझ शेख ते मधु मोटघरे यांच्या घरापर्यंत बी.टी. रोडाचे बांधकाम करणे ३.२३ लक्ष रुपये, अंबाळा वार्ड येथील विवीध रस्ते, पेविंग ब्लॉक व आर.सी नालीचे बांधकाम ३६ लक्ष रुपये, आंबेडकर वार्ड येथील

विवीध रस्ते, पेविंग ब्लॉक व आर.सी नालीचे बांधकाम २१.२ लक्ष रुपये, बेडकर वार्ड येथील विवीध रस्ते, पेविंग ब्लॉक व आर.सी नालीचे बांधकाम २१ लक्ष रूपये, प्रभाग क्रमांक ०३ मध्ये अंबाळा वार्ड येथे अंबाळा गेट पासून ते अशोक ढोमणे यांच्या घरापर्यंत सी.सी. रोडाचे बांधकाम करणे ३७ लक्ष रूपये, अशोक ढोमणे यांच्या घरापासून ते बापूराव नेवारे यांच्या घरापर्यंत काँक्रीट रोडचे बांधकाम करणे ४८ लक्ष रुपये, तिर्थक्षेत्र अंबाळा तलावाला सुरक्षा लोखंडी साखळी बसविण्याबाबत १० लक्ष रुपये, राजाजी वार्ड येथे घनश्याम पांडे व्यायाम शाळा इमारत दुरूस्ती करणे ५ लक्ष रूपये. शास्त्री चौक, रामटेक येथे परिसर विकास करणे १० लक्ष रूपये, आंबेडकर चौक येथे परिसर विकास करणे ५ लक्ष रूपये, सार्वजनिक अखाडा पापधुपेश्वर तेली समाज पंच कमेटी भवन १५ लक्ष रुपयांचे भूमिपूजन समारंभ संपन्न झाले. यावेळी बंडु सांगोडे,सुरेखा माकडे, महेश बिसन, विलास तांदुळकर, सुशील पडोळे,महेश माकडे, विष्णू लोखंडे, खुशाल चाकोले, सुनिल हत्तिठेले,बोपचे, आत्म्पुज्य सर राजेश नानोटे,हर्षल काँक्रिटवार, सौरभ सिंगणजुडे, जितु वालोकर,शिवसेना पदाधिकारी , कार्यकर्ते सह रामटेक शहरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]