जागतिक महिला दिनानिमित्त अंजली श्रीराम जंगम सुषमा स्वराज पुरस्कारने सन्मानित

रत्नागिरी (खेड):- जागतिक महिला दिनानिमित्त आज ०८/०३/२०२४ रोजी घाटकोपर पोलीस स्टेशन च्या वतीने आज सन्मान करण्यात आला माता बाल आरोग्य आहार प्रकल्प वस्ती परिवर्तन व मुलांचे संस्कार वर्ग या सगळ्या सामाजिक कामा बद्ल महिलांसाठी सामाजिक उन्नती व्हावी यासाठी सातत्याने काम करत
असणाऱ्या सौ अंजली श्रीराम जंगम याचा सन्मान करण्यात आला अशा सौ अंजली श्रीराम जंगम १/४/२०२३ रोजी सुषमा स्वराज पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या पायथ्याशी वारंगी गावचा जन्म १९९५ मध्ये विवाह नंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महिपत गडाच्या पायथ्याशी वसलेले 
माझे शिंगरी गावामध्ये मीआली मला माझ्या सासर म्हणजे माझे माहेरच होतं शिंगरी गाव म्हणजे संस्काराने पावन झालेलं गाव या गावांमध्ये मला माझ्या पतीच्या बरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम जवळुन पाहता आलं आणि म्हणूनच मला सामाजिक कामाची आवड निर्माण झाली गावांमध्ये ग्रामशिक्षण कमिटी मध्ये माझा सहभाग असे बचत गटामध्ये ग्रामपंचायत मध्ये सातत्याने सहभाग घेतला माझ्या गावच्यामंडळीने माझं खूप कौतुक केलं मला परिपूर्णता सहकार्य केले आमचे एक घर तरीपण गावच्या मंडलीचे पूर्ण सहकार्य असायचे आणि म्हणूनच समाजकार्यास मला चांगला सहभाग माझ्या घरच्यांच्या बरोबर माझ्याशिंगरी गावचा ही सहभाग 
होता आणि म्हणूनच १९९६ ते२०१०पर्यंत अनेक उपक्रमात सहभाग घेतला महिलांचे अनेक कार्यक्रम घेतले माझ्या गावातील प्रत्येक घराघरात माझा संपर्क राहिला आणि म्हणूनच आज मी या मुंबई शहरांमध्ये गेली बारा वर्षे माझ्या परीने सामाजिक क्षेत्रात काम करत राहिले त्याचप्रमाणे घाटकोपर मधील भटवाडी नगर म्हणजे संस्कृतीचे माहेरघर मला भटवाडी नगर मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपला सगळ्यांचा सहभाग होता आणि म्हणूनच मी सामाजिक क्षेत्रत काम करू शकले
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













