रायगड जिल्हा रिक्षा संघटना संयुक्त महासंघ परिवारा सह जन आक्रोश महामोर्चा
प्रतिनिधी पनवेल
रायगड (पनवेल) :- दिनांक ०६/०३/२०२४ रोजी रायगड जिल्हा रिक्षा संघटना संयुक्त संघ परिवार जन आक्रोश महामोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात पनवेल महानगरपालिकेच्या शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून करण्यात आली रिक्षा चालक-मालक यांच्या प्रमुख 
मागण्या पुढील प्रमाणे १) खुले परवाने (परमिट) बंद करा.२) घोषित झालेले कल्याणकारी महामंडळाची त्वरीत अंमलबजावणी करा.३) भरमसाठ वाढविलेला सुलतांनी दंड कमी करा ४) फोटो शुट ई चलनातून रिक्षाला वगळण्यात यावे ५) रिक्षा चालकांना गाडी पासिंग व कार्यालयीन कामामध्ये प्रथम प्राधान्य देण्यात यावे ६) लायसन्स, आरसी बुक, फिटनेस लवकर मिळत नाही त्यावर उपाय योजना करावी.७) एन.एम.एम.टी व के. डि.एम टी बसच्या वेळेत बदल 
करून दर एक तात्ताने तोडण्यात यावे ८) वाहन पॅसिग ट्रॅक वर वसण्यासाठी शेड, कॅन्टीन, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.९) विनाकारण रिक्षा चालकांना तपासणी दरम्यान त्रास देण्यात येवू नये.१०) गृह सोसायटयांनी सुरु केलेली खाजगी बस सेवा त्वरीत बंद करण्यात यावी या मागण्या मान्य करण्यासाठी हजारो रिक्षा चालक मालक यांनी आंदोलनं छेडले या आंदोलनामध्ये एकूण ३८ संघटनेने निवेदन दिले होते श्री. मधुकर दा. थोरात(अध्यक्ष अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट संघटना, पनवेल)श्री. कमलाकर ठाकूर(सचिव एकता रिक्षा चा. मा. संघटना, खारघर)श्री. निलेश म्हात्रे (अध्यक्ष भूमिरक्षक रिक्षा चा. मा.सं. नावडे, तळोजे) श्री. विजय कडू(अध्यक्ष उरण तालुका रिक्षा चा. मा.सं. कृतिसमिती उरण संलग्न १२ रिक्षा संघटना आहेत)श्री.तु.आर. जाधव(अध्यक्ष स्थानिक रिक्षा चा . मा.आसुडगाव) श्री. विलास सोनावळे(सरचिटनिस प्र. ग्रं रिक्षा चा मा.संघटना, चावणे, रसायनी)श्री. एकनाथ ठाकूर(उपाध्यक्ष एकता रिक्षा संघटना, खारघर)श्री. अशोक नथू पाटील(मा.सचिव अ.भा. मो. ट्रान्सपोर्ट संघटना)श्री अशोक विखारे(अध्यक्ष स्था. प्र. 
ग्रस्थ रिक्षा चा. मा.सं. करंजाडे) श्री नरेश परदेशी(अध्यक्ष प्रकल्पग्रस्त रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना चिंचपाडा, करंजाडे ). श्री. अय्युब खलिफा (अध्यक्ष पनवेल रेल्वेस्टेशन रिक्षा चा. मा. युनियन)श्री. गोरक्षनाथ (बाळा) झोडगे(अध्यक्ष बापदेव रिक्षा चा. मा. सं. नविन पनवेल) श्री. एकनाथदादा गायकवाड(अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा था. मा. सं. खांदा कॉलनी)श्री देवेंद्र भगत(अध्यक्ष उसराई गावदेवी रिक्षा चा. मा.सा.सं.उसर्ली)श्री. संदिप मुंडे(अध्यक्ष टाकी देवी रिक्षा चा. मा.नं. रसायनी मोहापाडा, पाताळगंगा परिसर.)श्री.सतीश आचार्य(अध्यक्ष रिक्षा टॅक्सी चा. मा. असो. पनवेल)श्री. जयेंद्र कोळी(उपाध्यक्ष रिक्षा संघटना, खारवर)श्री. परेश गोंधली(मा. खजिनदार अ.भा.मी. ट्रान्सपोर्ट संघटना) श्री. महेंद्र पाटील(अध्यक्ष शारदा ऐव्हरेस्ट रिक्षा संघठना, कळंबोली)श्री. 
शशिकांत सावंत(अध्यक्ष पनवेल रेल्वेस्टेशन रिक्षा टॅक्सी युनियन)श्री. रामचंद्र गायकर(अध्यक्ष स्था.प्र. ग्रस्त रिक्षा चा.मा.सं. रोडपाली)श्री. अनिल पाटील(उपाध्यक्ष एकता रिक्षा चा. मा.सं. बेलनाका तळोजा)श्री. अनिल कोंडीलकर (उपाध्यक्ष पनवेल ऑटो रिक्षा युनियन पनवेल) श्री रघुनाथ जुमरे(अध्यक्ष स्था.प्र. ग्रस्थ सं, चावणे रसायनी)श्री विजय दुंद्रेकर(अध्यक्ष वीचुंबे पोदी देवड रिक्षा चा मा. संघटना विचूंबे)श्री. महेंद्र कोळी(सल्लागार रिक्षा संघटना, खारघर)श्री. श्रीधर अष्टेकर(वरीष्ठ पदाधिकारी रिक्षा संघटना)(श्री. मच्छिंद्र द. पाटील(अध्यक्ष खांदेवर रेल्वेस्टेशन स्था. प्र. ग्रस्थ रिक्षा च. मा. संघटना)श्री. महादेव खांदवे(अध्यक्ष शिवप्रेमी चा. मा. कल्याणकारी सं.न्यू पनवेल) श्री. सुनिल नाईक(अध्यक्ष जय मल्हार रिक्षा चा. मा. सं. खांदा कॉलनी)श्री. आण्णा भिवा पाटील(अध्यक्ष जनसेवा रिक्षा, माननीय संस्था, पनवेल)श्री. सुनित पाटील(अध्यक्ष स्था.प्र. ग्रस्थ रिक्षा सं. रोहिजंण तळोजा)श्री. रविंद्र गोंधळी(उपाध्यक्ष खांदेधर रिक्षा चा. मा. संघटना)श्री दशरथ डांगरकर नाका अध्यक्ष : बस स्थानक इन गेट पनवेल)श्री. अनंता महाडिक ( आद्य
क्रांतिकारक वां.ब. फडके रिक्षा संघटना शिरढोण ) श्री. मारुती शिंदे (अध्यक्ष राजे शिव छत्रपती रिक्षा संगटणा खांदा कॉलनी ) या मागण्या पुर्ण करण्यासाठी हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय श्री. निलेश धोटे 
साहेब यांनी लेखी व तोंडी आश्वासन दिले की स्थानिक मागण्या मान्य करण्यात आल्या आणि शासन दरबारी असणाऱ्या मागण्या यांचा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले तशेच पोलीस प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल यांचे सुद्धा आभार मानण्यात आले .
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













