नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गाव चलो अभियाना’ ला सुरवात गोरेगाव भाजप चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केली कामाला सुरवात – आजचा महाराष्ट्र

गाव चलो अभियाना’ ला सुरवात गोरेगाव भाजप चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केली कामाला सुरवात

प्रतिनिधि पांडुरंग माने 

रायगड (माणगाव) :- महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा नारा दिला होता. आता भाजपाने पक्षाचा प्रचार करण्यासाठी १० फेब्रुवारीपासून गाव चलो  अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या ‘गाव चलो’ अभियानात सर्वांशी संवाद साधण्यात येणार आहे. मोदी की गॅरंटीचा नारा गावोगावी पोहचविला जाणार आहे. गाव चलो अभियानात बूथ प्रमुखांशी बैठक घेतली जाणार, मतदार यादीमधील लोकांशी चर्चा करणे, कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, नमो एपबाबत प्रचार करणे, हॅन्ड बिल वाटप करणे, संघाच्या

वरिष्ठ मंडळींशी चर्चा, युवकांसाठी नमो चषकचे आयोजन करणे, सामाजिक संस्थांशी चर्चा करणे, भिंती रंगवण्याचे काम करणे असे एकूण १८ कार्यक्रम राबविले जाणार आहेत.या अनुषंगाने गोरेगाव विभागातील भाजप चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी गोरेगाव, लोणेरे, उसरघर, मूर, भिंताड इत्यादी गावात योजना राबवण्यास सुरवात केली आहे हयात माणगाव तालुका युवा मोर्चा अध्यक्ष रितेश निवाते, माणगाव ता उत्तर भारतीय अध्यक्ष आनंद राजभर, भाजप चे नेते हरेश शेट,भाजप गोरेगाव शहर अध्यक्ष किशोर रातवडकर, माणगाव ता सरचिटणीस कौस्तुभ वझे इत्यादी उपस्थित होते

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]