नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनी समाजकंटकाचे कृत्य. – आजचा महाराष्ट्र

देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनी समाजकंटकाचे कृत्य.

प्रतिनीधी रामचंद्र घोडमोडे

न्यू इंग्लिश बागमांडले हायस्कूल मधील बंद संगणक व इतर सामान जाळण्याचा प्रकार.

रायगड (श्रीवर्धन) :- देशभरात ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना.श्रीवर्धन तालुक्यात एक वेगळ्या प्रकारची घटना घडली आहे. विद्येच मंदिर असणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील न्यू इंग्लिश बागमांडले हायस्कुल मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी अज्ञात समाज कंटका कडून रूम मध्ये बंद अवस्थेत असलेल्या संगणकाना व इतर साहित्याना आग लावल्याची

घटना घडले आहे. यामध्ये संगणक जळून खाक झाले असुन हायस्कूलच्या दरवाज्यावर काळा रंग फेकून खिडक्यांवर अश्लील शब्द लिहुन चित्र ही काढल्याचा घृणास्पद कृत्य केल्याची घटना घडली आहे,सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी श्रीवर्धन पोलीस अधिकारी येऊन घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली असुन पुढील अधिक तपास करत आहेत,प्रजासत्ताक दिनी हा घडलेला प्रकार दुर्दैवी असल्याची भावना स्थानिक नागरिक,आजी माजी विद्यार्थी,शिक्षक ,संस्थेचे पदाधिकारी व्यक्त करत असून संताप व्यक्त करीत आहेत ,ज्यांनी कोणी हे कृत्य केले असेल त्याचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यावर वर योग्य ती कारवाई करण्याची मागणी श्रीवर्धन पोलीसांना करण्यात आली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]