माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयुष्यमान भारत गोल्डन विमा कार्ड वाटप
प्रतिनिधि किरण बाथम
रायगड (पनवेल) :- शेतकरी कामगार पक्ष,पनवेल महानगर पालिका संयुक्त विद्यमाने शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयुष्यमान भारत गोल्डन विमा कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन शेकाप युवा नेते बबन विश्वकर्मा यांच्या
पुढाकाराने करण्यात आले होते. आमचे बाळाराम पाटील तसेच महापालिका विरोधी पक्षनेते प्रितम पाटील यांनी त्यांच्या कार्यामधून आम्हाला चांगल्या कामाचा आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेरणेने आम्ही समाजहितासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. असे मत बबन विश्वकर्मा यांनी मांडले.नवीन पनवेल डीएव्ही हायस्कूल समोर शेकाप कार्यालयाजवळ झालेल्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. सकाळपासून आबालवृद्धाची मोठी रिघ आयुष्यमान भारत विमाकार्ड घेण्यासाठी लागली होती.ऑनलाईन पद्धतीने रेशनकार्डच्या प्रकारानुसार सर्वांना ऑनलाईन नोंदणी करून कार्ड दिले गेले. नोंदणी 
नंतर अनेकांनी ओळखपत्रा सारखे कार्ड प्रिंट करून देखील घेतले. सगळी चोख व्यवस्था आयोजकांनी ठेवली होती.स्वतः बाळाराम पाटील तसेच प्रितम म्हात्रे यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन सर्वांचा उत्साह वाढवला.शेकडो लोकांना या योजनेचा लाभ या शिबिरात मिळाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनंत म्हात्रे, बळी म्हात्रे, शरद घुले,भरत पाटील आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













