आंबेवाडी ग्रामपंचायत सार्वजनिक स्मशानभूमीचे निकृष्ट दर्जाचे काम

रायगड (रोहा – कोलाड) :– रोहा तालुका हायवे लगत असणारी ग्रामपंचायत आंबेवाडी येथील सार्वजनिक स्मशानभूमीचे सुशोभीकरणाचे केलेले कामकाज निकृष्ट दर्जाचे असल्याने जनतेत नाराजी पसरलेले आहे हायवे लागत असणारा प्रवासासाठी प्रवाशांना सुलभ मुख्य नाका अनेक छोट्या छोट्या व्यवसायाने गजबजलेली बाजारपेठ त्याचबरोबर स्थानिक राजकीय मोठे नेतृत्वाचा वारसा लाभलेली ग्रामपंचायत अशी ओळख असल्यामुळे तिचे एक वेगळे 
महत्त्व विकास कामासाठी स्थानिक राजकीय मोठे नेतृत्व असल्यामुळे नेहमी खूप मोठा निधी प्राप्त होतो पण त्याचे योग्य नियोजन. करण्यात येत नसल्यामुळे केली जाणारी कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे खत लोकांमध्ये व्यक्त होत आहे सार्वजनिक
स्मशानभूमी अशी ओळख असलेले संजय गांधी झोपडपट्टीत बांधण्यात आलेल्या स्मशानभूमी काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याचे दिसत आहे या स्मशानभूमीचा उपयोग सार्वजनिक स्मशान भूमी म्हणून केला जातो तिच्या सुशोभीकरणाच्या उद्देशाने लोकप्रतिनिधीनी आमदार फंडातून १५ लक्ष रुपयांचे निधी निवारा शेड व सुशोभीकरण करण्यासाठी देण्यात आला प्रत्यक्ष लोकप्रतिनिने दिलेला निधीतून योग्य प्रकारे काम न झाल्याचे दिसत आहे शासन मंजूर इस्टिमेट प्रमाणे संपूर्ण काम न करता काही अर्धवट असताना रंगरंगोटी करून त्याचे उद्घाटन केल्यामुळे जनतेत नाराजीचे सूर आहेत स्मशानभूमीस केलेल्या कंपाऊंड वालचे वीट बांधकामाला स्मशान भूमीतून आतून प्लास्टर लाद्यांचे सुशोभीकरण करून कलर लावून चांगले दाखवण्याचा प्रयत्न करून बाहेरील भागात बिना प्लास्टर तशेच ठेवण्यात आलेले आहे कामाचा दर्जा कागदी वेगळे व प्रत्यक्षात वेगळे असे दिसत आहे ग्रामपंचायत मध्ये कागदोपत्री अधिकृत ठेकेदार दाखवून ग्रामपंचायत मधील लोकप्रतिनिधी हे स्वतःच काम करत असल्यामुळे अनेक ग्रामपंचायत मधील विकास कामांचा दर्जा घसरत

आहे याकडे राजकीय लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करताना दिसत आहेत आपल्याच पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या कामामुळे लोक प्रतिनिधीनी त्यांच्या केलेल्या कामांकडे व विकास कामासाठी दिलेल्या निधीचा योग्य वापर न झाल्याचे दिसत असतानाही दुर्लक्ष करून उद्घाटन करण्यात व्यस्त दिसत आहेत त्यामुळे शासन व जनतेच्या पैशाचा कसा गैर वापर केला जातो त्याचे प्रात्यक्षिक पहावयास मिळते अशा कामकाजास ग्रामपंचायत सचिव व देखरेखी करणारे वरिष्ठ अधिकारी अभियंता जबाबदार असल्याने स्थानिक जनतेत बोलले जात आहे त्याबाबत असंतोष आहे
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













