हजारोंच्या संख्येने कुणबी समाज रोहा प्रांत कार्यालयावर धडकला, कुणबी दाखल्यासाठी दिले निवेदन
रायगड (रोहा) :- रोहा तालुक्यातील कुणबी समाज आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाला. आज गुरूवारी १४ डिसेंबर रोजी कुणबी दाखल्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक आंदोलन करत हाजरोंच्या संख्येने रोहा प्रांत कार्यालयावर धडक देत कुणबी दाखला मिळत नसल्याने त्यासाठीचे निवेदन देत सदरच्या मोर्च्यातून शासनाकडे मागणी केली आहे.आपण जन्माने आणि कर्माने कुणबी आहोत त्यामुळे एक दिवस आपल्या मुलांच्या तसेच 
भावी पिढीच्या उन्नतीसाठी कुणबी दाखल्या अभावी आपले होत असलेले शैक्षणीक, नोकर भरती, विविध व्यवसाय तसेच शेती व्यवसायात, अर्थिक दृष्टया नुकसान या साठी हे आंदोलन रोहा तालुका कुणबी युवक संघटना तसेच कुणबी समाजोन्नती संघ शाखा रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली छेडण्यात आले होते याला तालुक्यांतील सर्व विभागीय ग्रूप समाज यांच्या वतीने उत्स्पूर्त प्रतिसाद मिळाला असुन हजारोंच्या संख्येने येथील कुणबी बांधव, युवक,युवती, महिलांनी सहभाग नोंदवला.कुणबी समाज उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष शंकरराव म्हसकर, कुणबी नेते तथा रायगड जिल्हा ओबीसी अध्यक्ष अध्यक्ष सुरेश मगर, रोहा तालुका कुणबी समाज अध्यक्ष शिवराम शिंदे, युवक अध्यक्ष अनंत थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाचे आयोजन कुणबी दाखला प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी करण्यात आले होते.जातीच्या दाखल्याच्या शिफारशीसाठी पात्रता १९६७ ऐवजी १९९० करावी, वंशावळीचे कार्यक्षेत्र जिल्हा स्तरावर गणले जावे, महसुली पुराव्याची अट रद्द करावी, मंडल आयोगानुसार २७ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे आदी मागण्या सदरच्या निवेदनातून शासनाकडे निवेदनातून केल्या आहेत.तर जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी होत असलेल्या जाचक अटी शर्ती मुले शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे लाक्षणिक आंदोलन शांततेत आणि सरळ मार्गाने छेडण्यात आले.यावेळी कुणबी समाज उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष शंकरराव म्हसकर,रायगड जिल्हा कुणबी समाज अध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपाध्यक्ष शंकरराव भगत, तालुका अध्यक्ष शिवराम शिंदे, युवक अध्यक्ष अनंत थिटे, मुंबई संघाचे उपाध्यक्ष सुनील ठाकूर,डॉ सागर सानप, डॉ मंगेश सानप, प्रो.माधव आगरी आदी तालुक्यांतील, चनेरा, आरे, तांबडी, गोपवट, सानेगाव, मेढा, धाटाव,सोनगाव, खांब, कोलाड, येरल, ऐनघर, नागोठणे, असे तेरा ग्रूप मधून कुणबी समाज बांधव आणि महीला वर्ग या प्रश्नांसाठी मोर्चात सहभागी होत प्रांत अधिकारी रोहा यांना निवेदाव्दारे मागणी करण्यात आली.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













