नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने जनजागृतीवर रॅलीचे आयोजन – आजचा महाराष्ट्र

जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने जनजागृतीवर रॅलीचे आयोजन

प्रतिनिधि जितीन शेट्टी

नवी मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्र हे एकाच छताखाली सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना सामावून घेणारे देशातील एकमेव आणि नावलौकिक प्राप्त केंद्र आहे. त्यांच्यामार्फत दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात.याचाच एक भाग म्हणून ०३ डिसेंबर म्हणजेच जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. समाजामध्ये दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करणे तसेच दिव्यांग मुलांना प्रोत्साहित करणे हा उद्देश साकारण्यासाठी संपूर्ण महिनाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये दिव्यांग मुले व व्यक्ती यांच्याप्रमाणे दिव्यांग मुलांचे पालक व त्यांच्याशी संबंधित काम करणा-या संस्था, व्यक्ती यांचाही सहभाग असणार आहे.या कार्यक्रमाचा भाग म्हणून ०४ डिसेंबर रोजी दिव्यांगात्वाबाबत जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली. यामध्ये नमुंमपा ईटीसी केंद्रातील विविध प्रवर्गातील दिव्यांग मुले व त्यांचे पालक आणि ईटीसी शिक्षक व कर्मचारी अतिशय उत्साहाने सहभाग झाले होते. रॅलीचा प्रारंभ सकाळी ९ वाजता ईटीसी केंद्र येथून झाला व वाशी गावामध्ये पूर्ण फेरी मारून घालून या रॅलीची ईटीसी केंद्रामध्ये सकाळी ११ वाजता सांगता करण्यात आली. अशाचप्रकारे या संपूर्ण महिन्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]