नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , छत्रपती शिवाजी महाराज आणि दत्त मंदिराच्या साक्षीने वायु प्रदूषण – आजचा महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज आणि दत्त मंदिराच्या साक्षीने वायु प्रदूषण

प्रतिनिधि समीर बामुगडे

बाळसई गावाच्या प्रवेशद्वारावर सिमेंट ब्रिक्सचा चुकीचा व्यवसायमहसूल व बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

रायगड (रोहा) :- कोणत्याही व्यवसायाला परवानगी देताना जनसामान्यांना प्रदूषण अथवा काही त्रास आहे कि नाही हे तपासले जाते. मात्र रोहा-वाकण रोड कडून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवर जाणा-या बाळसई गावाच्या प्रवेशद्वारावर असाच वायु प्रदूषण करणारा व्यवसाय खुलेआम सुरु आहे. सिमेंट ब्रिक्सच्या या व्यवसायामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि दत्त मंदिराच्या साक्षीने वायु प्रदूषण सुरु आहे. मंदिर आणि छत्रपती शिवरायांच्या मूर्तीसमोरच होणारा हा व्यवसाय स्थलांतरित करण्याची गरज आहे.कारण सगळ्यात पहिले हाच परिसर धुळीने घाण होतो आहे.प्रस्तुत प्रतिनिधीनी बाळासई गावात सदर प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी केली असता. ग्रामीण भाषेत गट्टू बनवणारा हा व्यावसायिक गावाच्या प्रवेशद्वारावर आपला गट्टूचा थाट मांडून बसला आहे. त्यामुळे सिमेंट-वाळूचा मोठा त्रास परिसरात दिसून येतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मोहक मूर्ती याठिकाणी वसवलेली आहे. या धुळीने सगळा परिसर माखलेला असतो. बाळसई गावातील नागरिकांना त्या ठिकाणी होणा-या धूळीचा सामना करावा लागत असून हा प्रकार ग्रामस्थ तसेच हमरस्त्या वरून जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या आरोग्याला हानिकारक आहे.हा व्यवसाय ‘त्या’ जागेवरुन स्थलांतरित करावा अशी मागणी जोर धरत आहे.ग्रामस्थांच्या बोलण्यातून हे दुखणं म्हणजे आपल्याच गावच्या बोरी आणि आपल्याच गावच्या बाभळी असं झालं आहे.पण अनेक योजना आणि उद्योग ग्रामस्थ मंडळींचा आग्रह असून प्रशासन कायद्याच्या चौकटी प्रमाणे अमान्य करते, मग या ठिकाणी काही अर्थपूर्ण मार्ग निघाले का ? अशी शंका देखील व्यक्त होते. या मागचा झारीतील शुक्राचार्य देखील शोधण्यासाठी संबंधीत महसूल आणि प्रदूषण मंडळ खात्याची आणि सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे.खरेतर असले उद्योग आडमार्गाला प्रदूषणाचा कुणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी असणे गरजेचे आहे. मात्र साधे भोळे ग्रामस्थ यांना कायदे माहिती नसल्याने वायु प्रदूषण करत उघडपणे हा प्रकार सुरु आहे.मात्र सर्वांना कायद्याचा बडगा उगारणारा महसूल विभाग अजूनही झोपेत आहे की झोपेचे सोंग घेऊन आहे. याच गावाच्या मार्गांवर सुप्रीम सारखी मोठी कंपनी आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी याच मार्गाने ये जा करतात. पण त्यांना देखील हा प्रकार दिसू नये? याचे मोठे आश्चर्य पर्यावरण प्रेमीना वाटत आहे. निसर्गसाथी संस्थेच्या माध्यमातून याप्रकरणी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल होणार असल्याचे संस्थे कडून सांगण्यात आले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]