नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , भिवंडीतील भू‍मि वर्ल्ड परिसरात पाणी चोरीचा गंभीर प्रकार; प्रशासनाकडे तक्रार – आजचा महाराष्ट्र

भिवंडीतील भू‍मि वर्ल्ड परिसरात पाणी चोरीचा गंभीर प्रकार; प्रशासनाकडे तक्रार

प्रतिनिधी

ठाणे ( भिवंडी ) :- ( आ.मा.टॉ.टे.न्यू ) भिवंडी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या पिंपळास भू‍मि वर्ल्ड परिसरात मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबत आगरी सेना भिवंडी तालुकाप्रमुख तथा स्थानिक रहिवासी श्री. योगराज गुरुनाथ भोईर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी

तक्रार दाखल केली आहे.तक्रारीनुसार, भू‍मि वर्ल्ड येथील ए-४ व ए-११-०७ या इमारतींच्या मागील बाजूस असलेल्या टीएमसी पाईपलाईनमधून अनधिकृतरीत्या पाणी उपसा केला जात आहे. हे पाणी मोठ्या प्रमाणावर साठवून पुढे विक्रीसाठी वापरले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दररोज सुमारे २०० ते ४०० टँकर पाणी चोरी करून विक्री होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती असूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय, स्थानिक नागरिकांना पिण्याचे पाणी दूषित असल्याचे सांगितले जात असताना हेच पाणी इतर ठिकाणी पुरवले जात असल्याचा विरोधाभासही समोर आला आहे.दरम्यान, पिंपळास व आजूबाजूच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना अशा प्रकारे पाण्याची चोरी व विक्री होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच पाणी चोरीचा हा प्रकार त्वरित थांबवावा, अशी मागणी तक्रारदार आगरी सेना भिवंडी तालुकाप्रमुख तथा स्थानिक रहिवासी श्री. योगराज गुरुनाथ भोईर यांनी आयुक्त ठाणे महानगरपालिका ,कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग ठाणे महानगरपालिका, कार्यकारी अभियंता शहाड टेमघर स्टेम पाणीपुरवठा प्राधिकरण ठाणे, कार्यकारी अभियंता शहाड टेमघर स्टेम पाणीपुरवठा प्राधिकरण भिवंडी, उपायुक्त अन्नपुरवठा विभाग भिवंडी यांच्याकडे केली आहे.स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]