श्रीवर्धन आगाराच्या बसमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर, कर्मचारी यांच्या कडूनच अनैतिक प्रकार केल्याची घटना
प्रतिनिधि रामचंद्र घोडमोडे
स्थानिक आमदार अदिती तटकरे यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
रायगड (श्रीवर्धन) :- श्रीवर्धन आगारातून सुटणारी बागमांडला मुंबई ही बस अनेक वर्ष श्रीवर्धन आगारातून रात्री ९.३० वाजता मुंबईकडे रवाना होत असते.परंतु एवढ्या वर्षाच्या कालावधीत कोणताही अनैतिक प्रकार बस मध्ये घडला नव्हता. परंतु दिनांक ३१/१०/२०२३ रोजी बस श्रीवर्धन आगारातून सुटल्यानंतर. बस मध्ये प्रवास करणारा एसटी महामंडळातील कर्मचारी निकेतन घोसाळकर त्याच्याकडून एक अनैतिक प्रकार घडल्याची लेखी तक्रार श्रीवर्धन स्थानक प्रमुख यांच्याकडे करण्यात आली असून याची प्रत श्रीवर्धन पोलीस स्टेशन तसेच व उपअधीक्षक कार्यालय श्रीवर्धन यांच्याकडे देण्यात आली आहे. सदरील पीडित महिला श्रीवर्धन बागमांडला या बसने प्रवास करत असताना याच बसने प्रवास करणाऱ्या एसटी कर्मचारी निकेतन घोसाळकर यांच्याकडून इंदापूर ते वाकण दरम्यान बस मधील महिलांवर हात टाकण्याचा प्रकार घडल्याची तक्रार सदरील बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सासऱ्याकडून करण्यात आली आहे. यावेळी महिलांकडून आरडा ओरडा केल्यानंतर सदरील बाब बसचे वाहक एस.एस.पवार व चालक बी. एन. यादव यांच्या निदर्शनास आणून दिली व बस पोलीस स्टेशन कडे नेण्याचे सांगितले. वाहक व चालक या दोन्ही एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून बस पोलीस स्टेशन कडे न नेहता सहकारी कर्मचाऱ्यांस वाकण फाटा येथे उतरवले. यामुळे श्रीवर्धन आगारावर प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली असून.ही बाब घडल्यानंतर सकाळी माहिती मिळताच पत्रकार यांनी वाहक एस.एस पवार यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून विचारणा केली होती परंतु अशी घटना बस मध्ये घडली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले होते.मग साधूला महादूची साथ होती का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी प्रवासादरम्यान पन्नास टक्के सूट दिली आहे. परंतु या प्रकारामुळे रात्रीच्या वेळेस प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पीडित महिलेच्या सासऱ्यांकडून आगार प्रमुखांकडे लेखी तक्रार दाखल झाल्यानंतर सदरील कर्मचाऱ्यांस निलंबित केल्याची चर्चा आहे. नुसते निलंबन करून हे प्रकरण मिटवून चालेल का ? तरी श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन रात्रीच्या वेळेस प्रवास करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने खास पावले उचलण्याची गरज आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













