अवेळी येणाऱ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन मध्ये रंगीत तालीम
प्रतिनिधी रामचंद्र घोडमोडे
रायगड (श्रीवर्धन) :- श्रीवर्धन तालुक्यामध्ये वेळोवेळी येणाऱ्या वादळांमध्ये प्रशासनाने कशा पद्धतीने समोर गेले पाहिजे याची रंगीत तालीम श्रीवर्धन तालुक्यात घेण्यात आली यावेळी फ्लाईंग बर्ड संस्थेचे पदाधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती तसेच यावेळी शासकीय अधिकारी वर्ग.फायर ब्रिगेड.स्वयंसेवक संस्थेची बोट. एसटी महामंडळाची बस. ॲम्बुलन्स. आरोग्य
सेवा.यांच्याकडून सज्ज राहून कार्यक्रम यशस्वी पार पाडले. उपविभागीय अधिकारी भोसले मॅडम. श्रीवर्धन तहसिलदार महेंद्र वाकलेकर. नगरपालिका मुख्याधिकारी लबडे. यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील चक्रीवादळ रंगीत तालीम घेण्यात आली. या समयी नगरपालिका स्टाफ. तसेच पोलिस निरीक्षक उत्तम रिकामे वैद्यकीय अधीक्षक डॉ गोरे मॅडम, फ्लायिंग बर्डस संस्थापक शोएब हमदुल्ले, तलाठी सुदर्शन पालवे, बाळकृष्ण भामरे मंडळ अधिकारी देऊळगावकर यांची उपस्थित होती
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













