महायुती पॅनलचे जिल्हा राखीव सर्वसाधारण उमेदवार सुनील दळवी यांना वाढता पाठिंबा

रत्नागिरी (खेड) :- रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक शनिवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२३ रोजी होत आहे या निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना शिक्षक सेना रत्नागिरी व कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका शाखा मंडणगड या संघटनेच्या महायुती पॅनल मधून जिल्हा सर्वसाधारण राखीव उमेदवार म्हणून श्री सुनील धोंडू दळवी यांना उमेदवारी मिळाली आहे सुनील दळवी हे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे रत्नागिरी शाखेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत एक 
आक्रमक व आश्वासक नेतृत्व म्हणून सुनील दळवी यांची पूर्ण जिल्हाभरात ओळख आहे १९९४ पासून सुमारे ३० वर्षे सुनील दळवी हे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेमध्ये कार्यरत आहेत खेड तालुक्यांमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या शिक्षक समितीचे माजी खेड तालुकाध्यक्ष स्वर्गीय रादि दळवी गुरुजी यांचे सुनील दळवी हे पुतणे आहेत घरातूनच संघटनेचे बाळकडू मिळालेल्या सुनील दळवी यांनी संघटनेच्या माध्यमातून अनेक शिक्षकांचे प्रश्न सोडवले आहेत सुनील दळवी यांच्यातील नेतृत्व गुण ओळखून सुनील सावंत यांनी सुनील दळवी यांच्याकडे खेड शिक्षक समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली आपल्या सहा वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये आक्रमक भाषण शैली निर्णय क्षमता व कामातील तत्परता यातून सुनील दळवी यांनी आपल्या अध्यक्षपदाची छाप पाडली सुनील दळवी यांच्या नेतृत्वगुणांमुळे रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने त्यांची निवड केली जिल्हा शिक्षण समितीतील आपल्या पाच वर्षाच्या कारकीर्दीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांचे अनेक प्रश्न सुनील दळवी यांनी मार्गी लावले त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील एक आश्वासक नेता म्हणून सुनील दळवी यांची जिल्हाभरात ओळख झाली त्यातूनच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करण्याची मोठी संधी सुनील दळवी यांना मिळाली त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जिल्हा सर्वसाधारण राखीव उमेदवार म्हणून संपूर्ण जिल्ह्याने महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील दळवी यांचे एकमताने निवड केली माहितीचे खेड तालुका उमेदवार शरद भोसले व जिल्हा राखीव उमेदवार सुनील दळवी या दोघांनी खेड तालुक्यामध्ये प्रचाराचा झंजावात निर्माण केला रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षक बंधू-भगिनी आपल्या समस्या घेऊन जिल्हा सरचिटणीस सुनील दळवी यांच्याकडे नेहमी येत असतात जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून या सर्व शिक्षक बंधू-भगिनींच्या समस्या सोडवण्याचे काम सुनील दळवी हे सतत करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमध्ये सुनील दळवी यांना ओळखणारा शिक्षक वर्ग आहे १००% कामाची हमी शिक्षकांसाठी २४ तास उपलब्ध असलेला नेता सुखदुःखाच्या क्षणी धावून जाणारा सहकारी अशी सुनील दळवी यांची ओळख आहे माहिती पॅनल मधील सर्व समाविष्ट संघटना कार्यकर्त्यांचा फार मोठा फौज फाटा महिला शिक्षक भगिनींनी केलेला आक्रमक प्रचार व सुनील दळवी यांची वैयक्तिक इमेज त्यामुळे सुनील दळवी हे रत्नागिरी जिल्ह्यामधून भरघोस मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास महायुती पॅनल मधील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी व्यक्त केला आहे सुनील दळवी यांच्या रूपाने सहकारातील एक आश्वासक चेहरा शिक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेला नेता पतपेढी मध्ये संचालक म्हणून जाणार आहे आपण सर्वांनी टेबल या निशाणीवर शिक्का मारून सुनील दळवी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आठ उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन माहिती पॅनल प्रचार प्रमुखातर्फे करण्यात आले आहे
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













