मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शिराळा तालुक्यातील अंत्री गावातील तरुणांनी एकत्र येऊन साखळी उपोषण सुरू केले त्यासंबंधी शिराळा तहसीलदार यांना पत्र दिले*
प्रतिनिधि शिराळा
शिराळा :- मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी तळागाळातून समाजातील तरुण, तरुणी , वृद्ध, लहान मुले सुद्धा मागे राहिली नाहीत गावागावातून याची प्रचिती येत आहे. मराठा समाजाचे शिवश्री. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणा बद्दल जो 
लढा उभा केला आहे त्याला अखंड महाराष्ट्रातील मराठा समाज पाठींबा देत आहे. त्यातीलच उदाहरण. म्हणजे शिराळा तालुक्यातील अंत्री बुद्रुक गावातील मराठा समाजातील तरुणांनी एकत्र येत 
साखळी उपोषण सुरू केले आहे त्याबद्दल शिराळा तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. मनोज पाटील यांनी सांगितल्या प्रमाणे अगदी शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण चालू आहे यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













