बागमांडले पंचक्रोशीतील नागरिकांसाठी आनंदाची बातमी
प्रतिनीधी रामचंद्र घोडमोडे
प्रतिनीधी रामचंद्र घोडमोडेबँक ऑफ महाराष्ट्र बागमांडले शाखेचे श्रीवर्धन शाखेत होणारे विलीगिकरण थांबले.
रायगड (श्रीवर्धन) :- श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडले गावामध्ये अनेक वर्ष असणारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बंद करण्यात येणार होती,तीचे विलीगिकरण श्रीवर्धन येथील शाखेमध्ये होणार असल्याची, अधिकृत नोटीस शाखेकडून प्रकाशित करण्यात आली
होती.याचा फटका बागमांडले पंचक्रोशीतील नागरिकांना बसणार होता. परिसरातील नागरिकांचे होणारे आर्थिक व्यवहार करण्यासाठी,त्यांना श्रीवर्धन शहर गाठावे लागणार होते,यामुळे या विलगिकरणाला स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला होता. सदर बँकेचे होणारे विलीगिकरण काही काळासाठी थांबवण्यात आले.असुन सद्या तरी थांबलेल्या विलगिकरणा मुळे,पंचक्रोशीतील जनतेला दिलासा मिळालेला आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













