नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्रीवर्धन तालुक्यात गाईवर बिबट्याचा हल्ला. घटना सी. सी. टीव्ही मध्ये कैद – आजचा महाराष्ट्र

श्रीवर्धन तालुक्यात गाईवर बिबट्याचा हल्ला. घटना सी. सी. टीव्ही मध्ये कैद

प्रतिनिधी रामचंद्र घोडमोडे

रायगड (श्रीवर्धन) :- श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर रोडवरील सायगाव गावा जवळील डॅम रोडवर असणाऱ्या अमित कामत व सौ मानसी कामत यांच्या मालकीच्या कामत फार्म हाऊस वर गोठ्यात बांधण्यात आलेल्या गाईवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली.बिबट्याने केलेल्या हल्ल्या मध्ये गाईचा मृत्यू झाला आहे.घडलेली घटना सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून याची माहिती फार्म हाऊस वर काम करणाऱ्या व्यक्तीं कडून वनविभाग श्रीवर्धन यांना देण्यात आली. या परिसरात अनेक फार्म हाऊस तसेच रिसॉर्ट सुद्धा आहेत. रस्त्या नजीक असलेल्या फार्म हाऊसवर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्याची माहिती फार्म हाऊसचे मालक अमित कामत यांनी दिली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]