नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रोठ खुर्द गावचे कुलदैवत श्री वाघेश्र्वर महाराज आई भवानी माता घटी बसले – आजचा महाराष्ट्र

रोठ खुर्द गावचे कुलदैवत श्री वाघेश्र्वर महाराज आई भवानी माता घटी बसले

प्रतिनिधि रोहा 

रायगड (रोहा) :- रोठ खुर्द गावच्या परंपरे नुसार सुरू असलेले नवरात्र उत्सवाचे रोठ खुर्द वासीयांचे श्रद्धास्थान असलेले गावचे कुल ग्रामदैवत श्री वाघेश्र्वर महाराज आणि जय भवानी माता यांचे अत्यंत मंगलमय वातावरणात रविवारी देवघटी बसवले आणि नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. सुंदर आणि भव्य मंदिरामध्ये गाभाऱ्यात श्री वाघेश्र्वर महाराज, जय भवानी माता मंदिरात ग्रामस्थांनी श्रद्धेने आणि पारंपारिक पद्धतीने नवरात्रोत्सव मांडला आहे, या उत्सवामध्ये आमच्या हातून चांगली सेवा होईल, काही चुका सुद्धा होतील, पण उत्सव गोड मानून घे आमच्या गावाला संकटापासून दूर ठेव असे शेकडो भक्तांच्या उपस्थितीत देवाकडे गाऱ्हाणे मांडले आणि अक्षतांची उधळण देवावर करून मोठ्या उत्साहात शुभारंभ केला. यावेळी परपरे नुसार गोंधळ्यांची आरती, विविध वाद्य आणि घंटानादाने आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या वातावरणात ग्रामदैवताची महाआरती पार पडली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]