नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , हाळ खुर्द येथील उर्दू शाळेच्या विकासासाठी आमदार महेंद्र थोरवेंचा पुढाकार – आजचा महाराष्ट्र

हाळ खुर्द येथील उर्दू शाळेच्या विकासासाठी आमदार महेंद्र थोरवेंचा पुढाकार

प्रतिनीधी साबीर शेख

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील अल्पसंख्याकांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध – आमदार महेंद्र थोरवे

रायगड (खोपोली) :- इ. स १९०५ साली रेती, खडी, लाकडी वासे आणि मातीची कौले वापरून बांधण्यात आलेली रा.जी.प उर्दू शाळा, हाळखुर्द ही शंभर वर्षापेक्षा जुनी झालेली शाळा पुनर्बांधणीच्या प्रतीक्षेत असल्याचे निवेदन, बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर याची दखल कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तत्काळ घेत या शाळेच्या पुनर्विकास आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सरकार कटिबद्ध असल्याची भावना याठिकाणी भेट देताना व्यक्त केली.१०० वर्षांपासून अधिक काळानंतर ही पूर्णबांधनीच्या प्रतीक्षेत असल्याचे

निवेदन आमदार महेंद्र थोरवे यांच्यापर्यंत पोहोचताच सदर शाळेच्या पुनर्बांधणीची मागणी सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. हाळ खुर्द ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आलेल्या मागणीनुसार, अंदाजे १२ गुंठ्यांत नवीन बांधकाम करून आधुनिक अशी सर्व सोयी सुविधायुक्त असलेली शाळा उभारणीसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू असे आव्हान आमदार महेंद्र थोरवे यांनी आज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या पाहणी दौऱ्या दरम्यान हाळ ग्रामस्थांच्या उपस्थित केले.या पाहणी दौऱ्याला आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह शिवसेना नेते विजय पाटील, जिल्हा नियोजन सदस्य संजय नाना देशमुख,भाजपा नेते साबीर शेख, सरपंच शबनम मुल्ला, उपसरपंच अजीम मांडलेकर, सदस्य कासिम बेडेकर ,सदस्य कमली वाघमारे, सदस्य असिफ बेडेकर, सदस्य प्रभास क्षीरसागर, शालेय व्यवस्थापन समिती ग्रामस्थ मंगेश क्षीरसागर, हुसेन जळगावकर ,जाई बुंननिसा शेख, अब्बास राऊत ,अख्तर दुस्ते, नासिर करजीकर, इस्माईल करजीकर ,अकबर जळगावकर, रज्जाक मांडलेकर, वसीम कर्जीकर ,अल्ताफ जळगावकर, दाऊद मुल्ला, ग्रामसेवक अधिकारी वर्ग आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]