भालाफेक सराव दरम्यान १५ वर्षीय विद्यार्थ्यांचा डोक्यावर भाला लागून मृत्यू

रायगड (माणगाव) :- आय.एन.टी इंग्लिश स्कूल वनी पुरार येथील घटना शाळेत तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धे दरम्यान घडली घटना माणगाव तालुक्यात गोरेगाव नजिक आय. एन . टी इंग्लिश स्कूल वनी पुरार येथे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धे दरम्यान भालाफेक 
सराव करताना आय. एन. टी इंग्लिश स्कूल वनी पुरार येथे शिकत असणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा डोक्यात भाला लागून मृत्यू झालेची दुःखद घटना घडली आहे. मृत्यू विद्यार्थी दहीवली कोंड येथील हुजैफा कुतबुद्दिन डावरे ह्याला तत्काळ गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र आरोग्य केंद्र गोरेगाव येथे 
दाखल होण्याच्या आधीच हूजैफा ह्याने प्राण सोडले होते मृत्यू विद्यार्थीचा वत शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे, dysp पोंदकुले तसेच गोरेगाव सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांनी घटना स्थळी पाहणी केली असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव पोलीस करीत आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आय एन टी इंग्लिश स्कूल मार्फत हलगर्जीपणा उघडकीस आला आहे. अशी जनतेत चर्चा सुरू आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













