नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , स्टार अकॅडमी इंग्लिश स्कूल भट्टीचामाळ शाळेत शिक्षक दिन साजरा – आजचा महाराष्ट्र

स्टार अकॅडमी इंग्लिश स्कूल भट्टीचामाळ शाळेत शिक्षक दिन साजरा

प्रतिनिधी रामचंद्र घोडमोडे

रायगड (श्रीवर्धन) :- ५ सप्टेंबर १८८८ रोजी तिरुटानि तामिळनाडू येथे जन्मलेले डॉ राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती तसेच पहिले उपराष्ट्रपती होते. त्यांना भारतरत्न पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता. त्यांची जयंती भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येत असते. याच निमित्ताने स्टार अकॅडमी इंग्लिश स्कूल भट्टीचा माळ येथील शाळेतील शिक्षक यांनी विविध प्रकारचे खेळ खेळत शिक्षक

दिन साजरा केला. शाळेमध्ये शिक्षक दिनाची तयारी अगोदर पासून करण्यात आली होती. शाळेतील नववी तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना एक दिवसासाठी शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांना पहिली ते आठवीच्या विद्यार्थी वर्गांना शिकवण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांना शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]