श्रीवर्धन मध्ये तालूका स्तरीय रानभाजी महोत्सव २०२३ साजरा
प्रतिनिधी रामचंद्र घोडमोडे
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांची उपस्थिती
रायगड (श्रीवर्धन) :- रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मध्ये तहसील कार्यालय श्रीवर्धन येथे २०२३ मधील तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महिला व बाल विकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना असताना जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी रानभाजी महोत्सव साजरा 
करण्यात आला.असेच महोत्सव दरवर्षी झाले पाहिजेत जेणे करून शेतकरी तसेच गावातील नागरिकांना याचे महत्व समजेल. कोविडच्या वेळी डॉक्टरांनी सांगितले होते पाले भाजी खाणे शरीरा साठी किती महत्वाचे आहे आपण भाज्यांचे सेवन कराल तर आपली प्रतिकार शक्ती वाढू शकते पाले भाजी हे सगळ्यात मोठे टॉनिक आहे.येथे वेगवेगळ्या प्रकारचे भाजी पाला घरगुती खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. बचत गटास प्राधान्य दिले पाहिजे. अताची पिढी यु ट्यूब वर पाहून फास्ट रेसिपी करायला पाहतात घरगुती पदार्थ हे खूप चांगले पौष्टिक असतात काही बचत गटांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे त्यांना स्वतंत्र मार्केट उपलब करून देण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी अदिती तटकरे यांच्या हस्ते रानभाजी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी पुस्तकामध्ये असलेल्या कृषी विभागाच्या योजना तसेच शासनाच्या विविध योजना
पुस्तकांमध्ये असल्याचा उल्लेख केला. उपस्थित असणाऱ्या सर्व महिला बचत गट तसेच इतर महिला यांना मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी बी.डी. ओ गजानन लेंडी. तहसीलदार महेंद्र वाकलेकर. विविध शासकीय कार्यालय अधिकारी. महम्मद मेमन. जितेंद्र सातनाक. मंगेश कोमनाक. सरपंच. ग्रामसेवक.तालुक्यातील शेतकरी वर्ग तसेच महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













