नमस्कार आमच्या आजचा महाराष्ट्र टॉप टेन मराठी न्यूज चॅनेल मधे आपल स्वागत आहे...येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9029198881 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , करंजाडे सेक्टर-६ रहिवाशांना मिळणार मुबलक पाणी; कार्यसम्राट सरपंच मंगेश शेलार यांच्या शुभहस्ते प्रत्यक्ष कामाला शुभारंभ – आजचा महाराष्ट्र

करंजाडे सेक्टर-६ रहिवाशांना मिळणार मुबलक पाणी; कार्यसम्राट सरपंच मंगेश शेलार यांच्या शुभहस्ते प्रत्यक्ष कामाला शुभारंभ

प्रतिनीधी/जितीन शेट्टी

रायगड (पनवेल) :- सिडकोच्या वतीने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातील तांत्रिक अडचणींमुळे करंजाडे रोड मधील सेक्टर ६ च्या रहिवाशांना असंतुलित पाणीपुरवठा होत होता. सरपंच मंगेश शेलार यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कंबर कसली होती. सेक्टर सहा मधील रहिवाशांकरता वेगळी पाण्याची जोडणी दिल्यास तेथे मुबलक पाणीपुरवठा होऊ शकतो याची खात्री झाल्यानंतर सोमवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी कार्यसम्राट सरपंच मंगेश शेलार यांच्या शुभ हस्ते पाणीपुरवठा प्रत्यक्ष कामास शुभारंभ करण्यात आला.     

 आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश शेलार आणि त्यांची टीम अत्यंत कसोटीने काम करत आहे. करंजाडे विभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना मूलभूत सुविधा प्रदान करण्यासाठी मंगेश शेलार व त्यांचे सदस्य सहकारी नेहमीच तैनात असतात. पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावताच ती समूळ नष्ट करण्याकडे सरपंच मंगेश शेलार यांचा कल होता.सोमवारी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

नव्या पाईपलाईनच्या भूमिपूजन समारंभासाठी सरपंच मंगेश शेलार यांच्या समवेत विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, भाजपा तालुका उपाध्यक्ष बळीराम म्हात्रे, उपाध्यक्ष नाथाभाई भरवाड, भाजपा शहर सरचिटणीस सचिन कदम, बळीराम भोईर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

चौकट..

सरपंच मंगेश शेलार यांना कोंडीत पकडण्याच्या दृष्टीने असंतुलित पाणीपुरवठ्याच्या समस्येचे स्तोम-माजवत काही माजी लोकप्रतिनिधींनी मोर्चा काढण्याचा घाट घातला आहे. परंतु कार्यतत्पर सरपंच मंगेश शेलार यांनी प्रत्यक्ष नव्या पाईपलाईनच्या कामास शुभारंभ केल्यामुळे स्टंटबाजी करणाऱ्यांच्या मोर्चा मधली हवा निघून गेली आहे असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

[responsivevoice_button voice="Hindi Female"]