पारध पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे अवैध धंदे बंद करा

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे जालना जिल्हा अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आक्रमक. पारध पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व अवैध धंदेबंद करण्यासाठी दिले निवेदन
जालना :- भोकरदन तालुक्यातील व भोकरदन पोलीस ठाणे व पारध पोलीस ठाणे यांच्या अंतर्गत येणाऱ्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावेत यासाठी निवेदन देण्यात आले. अवैध सटका मटका, ऑनलाईन जुगार, पत्ते, देशी विदेशी दारू, ऑनलाईन जुगार, अवैध गुटखा विक्री रेती तस्करी, मुरूम तस्करी इतर अवैध धंदे बंद करण्यात यावे वरील प्रमाणे अवैध धंदे करणार्यांच्या विरोधात कारवाई करावी तर नंबर प्लेट नसलेल्या वाहनां वर कडक कारवाई करावी . हायवा टिप्पर ट्रॅक्टर जनतेच्या जीवाशी खेळ खेळतात 
त्यांना कोणत्याही प्रकारचे भय वाटत नाही ते आपले वाहन भरधाव वेगाने चालवून समोरील व्यक्तिचा जीव धोक्यात आणतात. शालेय विद्यार्थी व गावकरी यांना एका प्रकारे कमी पैशात जास्त पैसे कमविण्याचे आमिष दाखवून जुगार चालक गोरगरीब लोकांना फसवतात लालसेपोटी लोकांच्या संसाराचे वाटोळे होताना दिसत आहे. त्यामुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही व शालेय विद्यार्थी सुद्धा गुटखा पुडी, दारूचे व्यसन सह मटका ऑनलाईन जुगार यांच्या आहारी जात आहेत त्यामुळे त्यांचे भविष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. रेती, मुरूम तस्करी करणार्या लोकांचे रेतीचे वाहन सुसाट वेगाने तसेच विना नंबर प्लेटचे असते रस्त्यावर येणार्या जाणार्या नागरिकांना त्रास होत असून रेती तस्कर नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. यांना कोणीतेही भय राहिले नाही तसेच हे वाहन चालक एक्सीडेंट करून आपले वाहन पसार करताना दिसत आहे. तसेच रेतीची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच हे लोक कोणत्याही प्रकारच्या पावत्या नसताना गावकऱ्यांना चढ्या भावाने रेती विक्री करताना दिसतात हे सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती पदाधिकारी यांनी एका निवेदनात सादर करून माननीय अधिकारी पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांनी वरील अवैध धंदे करणाऱ्यांवर लोकांवर कारवाई करून अवैध धंदे बंद करावे तरी मा.अधिकारी पोलीस प्रशासन महसूल विभाग यांनी वरील निवेदनाचा विचार करून अवैध धंदे तात्काळ बंद करावे असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य जालना जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्णा सपकाळ. जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र लोखंडे. तालुका अध्यक्ष. सचिन विंडोले. माहिती अधिकारचे पदाधिकारी श्री गणेश किसते. श्रीराम डमाळे. श्री एकनाथ पांडव श्री आहेर . ज्ञानेश्वर सपकाळ जळगाव. श्री संजय जोशी जळगाव श्री गणेश मोठे जळगाव श्री गणेश देशमुख समीर शेख. अनिस शेख .बालाजी सपकाळ जळगाव. आशिष भुते वालसावंगी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space













